मॅच पाहण्यासाठी असाही वेडेपणा?? आता तर हद्द झाली राव!!

मंडळी लोकांना नाना गोष्टींचं वेड असतं. पण त्यातल्या त्यात जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांचं फुटबॉल वेड थोडं जास्तच भाव खाऊन जातं राव! हे लोक आपल्या फुटबॉल वेडापायी काय काय प्रताप करतील याचा अंदाज येणं थोडं कठीणच! आणि याची प्रचिती तुम्ही हा प्रकार वाचून घेऊ शकता...

झालं असं की, एका तुर्कीश फुटबॉल चाहत्याला मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली. पण या जबरा फॅनला कोणत्याही परिस्थितीत हा फुटबॉल सामना पहायचाच होता. त्यामुळे या बहाद्दराने चक्क भाड्याने क्रेन आणून स्टेडीयमलगत पार्क केली!! आणि त्याच क्रेनच्या मदतीने उंचावर उभं राहून त्याने हा सामना अगदी थाटात पाहिला!!

Gaziantepspor आणि Denizlispor या दोन तुर्कीश फुटबॉल क्लब्समधे हा सामना सुरू  होता. हा माणूस Denizlispor क्लबचा कट्टर चाहता असल्यामुळं आपल्या आवडत्या संघाचा सामना पाहण्यासाठी त्यानं ही करामत केली. क्लबच्या ध्वजासोबत क्रेनवर उभं राहून आपल्या संघाला तो प्रोत्साहन देत होता, आणि इकडे स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक त्याची ही आगळीवेगळी करामत पाहून त्याला प्रोत्साहन देत होते. विशेष म्हणजे त्याच्या आवडत्या Denizlispor क्लबने ही मॅच ५-० गोल्सने जिंकली!

या माणसावर स्टेडीयम प्रवेशाची बंदी का घातली होती हे कळलं नसलं तरी या मनुष्याचा हा पराक्रम पाहून आता ती बंदी उठवणंच योग्य ठरेल...

सबस्क्राईब करा

* indicates required