आपला डोळा किती मेगापिक्सल असतो ?? माहित आहे का भाऊ !!

मोबाईलचा कॅमेरा जितका भारी तितका आपला मोबाईल भारी राव. ८ मेगापिक्सेल, १२ मेगापिक्सेल, १५ मेगापिक्सेल पण त्या कॅमेऱ्याचं काय जो आपल्याला जन्मजात मिळाला आहे ? म्हणजे आपले डोळे राव. आपले हे दोन कॅमेरे किती मेगापिक्सेल असावेत ? तुम्हाला काय वाटतं ? डोक्यावर जास्त जोर नका देऊ. आम्हीच सांगतो.

स्रोत

मंडळी, सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे डिजिटल इमेज अनेक लहान लहान  ‘पिक्सेल्स’ ने तयार झालेली असतो. मोबाईल, कॉम्पुटर किंवा इतर माध्यमातून जे चित्र आपल्याला दिसतं ते पिक्सेल्सने तयार झालेलं असतं. ह्या पिक्सेल्सच्या संख्येवरून त्या इमेजची गुणवत्ता ठरते. तुम्ही सुद्धा अनेकदा अनुभव घेतला असेल. फोटो झूम केल्यानंतर एका ठराविक पातळी नंतर फोटो पुसट(ब्लर) दिसू लागतो. हे यासाठी कारण त्यात पिक्सेल्सची संख्या मर्यादित आहे त्यामुळे फोटो मधले बारकावे टिपता आलेले नाहीत.

तर, मेगा पिक्सेल्स म्हणजे काही लाख मेगापिक्सेल्स असतात. तुमचा मोबाईल कॅमेरा हा २ ते २० मेगापिक्सेल किंवा जास्त असू शकतो. म्हणजे २ ते २० लाख पिक्सेल्सने तयार झालेली इमेज तुमच्या मोबाईलवर येऊ शकते. त्यामुळे २ मेगापिक्सेल कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि २० मेगापिक्से कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोत मोठा फरक असतो.

स्रोत

आता आपल्या डोळ्याकडे वळूयात. खरं तर मानवी डोळा आणि कॅमरा यांची तुलना होऊच शकत नाही. डोळा हे मेंदू पर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करत असतं. पण जर कॅमेरा आणि डोळा यांची तुलना करायचीच झाली तर मानवी डोळा हा तब्बल ५७६ मेगापिक्सेल आहे असं मानलं जातं. तुम्ही डोळ्यांनी जे काही बघत आहात त्याची मेगापिक्सेल्सच्या दृष्टीने आखणी केली तर तुमच्या समोरील दृश्य हे तब्बल ५७६ लाख पिक्सेल्सने तयार झालेलं आहे.

पण मंडळी मानवी डोळा आणि कॅमेरा यांची तुलना होऊच शकत नाही. वर दिलेला आकडा हा फक्त अंदाज वर्तवतो.

 

आणखी वाचा :

तुम्ही तुमच्या स्वतःच्या पांढऱ्या रक्तपेशी उघड्या डोळ्यांनी पाह्यल्या आहेत.. विश्वास नाही बसत ? मग हे वाचाच...