सौरव गांगुलीवर बॅन लागला नसता तर वीरू मुलतानचा सुलतान झाला नसता; वाचा संपूर्ण किस्सा...

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची वनडे कारकीर्द १९९९ मध्ये सुरू झाली होती. पाकिस्तान विरुध्द झालेल्या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नव्हता.  पेप्सी कपच्या अंतिम सामन्यातपूर्वी झालेल्या सामन्यात त्याला केवळ १ धाव करता आली होती. तसेच गोलंदाजी करताना अवघ्या ३ षटकात त्याने ३५ धावा खर्च केल्या होता. अशी कामगिरी पाहता टीका होणं साहजिक आहे. याच कारणामुळे तो संघाबाहेर झाला आणि पुढील २ वर्षे जेव्हा जेव्हा संघाची निवड सुरू असताना वीरेंद्र सेहवागचे नाव पुकारले जायचे तेव्हा कोणीही होकार द्यायचं नाही.

संघातून बाहेर झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला. खालच्या फळीत फलंदाजीला येऊन देखील तो ५० च्या सरासरीने धावा करत होता. मात्र पहिल्याच सामन्यात केलेली निराशाजनक कामगिरी त्याच्या या चांगल्या कामगिरीवर पडदा टाकत होती. अशा परिस्थितीत मदनलाल यांना एक कल्पना सुचली.  बोर्डाचे सचिव जयवंत लेले आणि मुख्य निवडकर्ता चंदू बोर्डे हे चांगले मित्र असल्याचे त्यांना माहीत होते.  मैत्री इतकी घट्ट होती की चंदू बोर्डे जयवंत लेले यांना आपला जोडीदार म्हणायचे. 


तर झाले असे की, एक दिवस मदन लाल यांनी जयवंत लेले यांना भेटण्यासाठी बोलवलं आणि पुन्हा वीरेंद्र सेहवागच्या नावाची शिफारस केली. वीरेंद्र सेहवागसारखा खेळाडू नाही आणि जयवंत लेले यांनी त्याची शिफारस केली तर मला कधीच पश्चाताप होणार नाही, असेही मदन लाल म्हणाले.

गांगुलीवर निर्बंध लागल्यानंतर झाली वीरेंद्र सेहवागची एन्ट्री...

झिम्बाब्वे संघ भारत दौऱ्यावर येणार होता. मदन लाल जयवंत लेलेंकडे वीरेंद्र सेहवागची शिफारस करत होते. त्यामुळे अखेर वीरेंद्र सेहवागला १५ खेळाडूंमध्ये संधी मिळाली. मालिकेतील अंतिम सामना राजकोटच्या मैदानावर पार पडणार होता. या सामन्यापूर्वी स्लो ओव्हर रेटमुळे सौरव गांगुलीवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे राहुल द्रविड संघाचे नेतृत्व करणार होता.

त्यावेळी मदन लाल यांनी चंदू बोर्डे यांना फोन केला, पण सेहवागचे नाव ऐकताच चंदू बोर्डे यांनी नकार दिला. त्यांनी स्पष्ट नकार देत म्हटले की, कुठल्याही परिस्थितीत सेहवागला प्लेइंग ११ मध्ये संधी देता येणार नाही.

मदन लाल यांनी ही गोष्ट जयवंत लेले यांना सांगितली. नेहमी प्रमाणेच पुन्हा एकदा जयवंत लेले यांनी चंदू बोर्डे यांना समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, भारतीय संघाने मालिकेतील २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे सेहवागला एक संधी देण्यात काहीच अडचण नाहीये. अखेर चंदू बोर्डे यांनी होकार दिला. मात्र एक अट देखील ठेवली होती. बोर्डे यांनी म्हटले की, वीरेंद्र सेहवागला संधी देतोय पण संपूर्ण जबाबदारी तुम्हाला (लेले) घ्यावी लागेल. त्यावेळी लेलेंनी कुठलाही विचार न करता ही अट मान्य केली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required