computer

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१: आजच्या सामन्यापूर्वी बदलण्यात आलेले ५ महत्त्वाचे नियम!!

आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होऊ घातला आहे. कसोटी प्रेमींनी गेली दोन वर्षे या क्षणाची वाट पाहिली होती. कसोटीचा चॅम्पियन कोण याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. भारत आणि न्यूझीलँड दरम्यान होणाऱ्या फायनलपूर्वी आयसीसीने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

१) LBW मधील बदल

गेली काही दिवस LBW बद्दल बऱ्याच चर्चा सुरू होत्या. यामुळे फायनलपूर्वी नियम बदलत आयसीसीने विकेट झोनसाठीची उंची स्टंपच्या टॉपपर्यंत वाढवली आहे. याचा फायदा असा की, अंपायरच्या कॉल संबंधी असणारे मतभेद दूर होण्यास मदत होणार आहे.

२) मैदानावरील शॉर्ट रन

मैदानावर अंपायर जेव्हा शॉर्ट रन घेतो तेव्हा थर्ड अंपायर आधीच त्याची शहानिशा करेल. त्यानंतर तो मैदानावरील अंपायरला त्याचा निर्णय चूक आहे को बरोबर हे कळवेल. हे झाल्यानंतरच पुढचा बॉल टाकला जाईल. यामुळे अचूकता वाढण्यास मदत होणार आहे.

३) LBW संबंधी चर्चा

फिल्डिंग करणारा कॅप्टन किंवा आउट झालेला बॅट्समन LBW चा निकाला लागल्यानंतर बॉल योग्यरीतीने टाकण्यात आला होता का यासंबंधी अंपायर सोबत चर्चा करून शकतात. यामुळे मात्र अंपायरवर मोठा दबाव येऊ शकतो.

४) राखीव दिवस आणि संयुक्त विजेते.

मध्येच पावसाने खेळात विघ्न आणले  तर त्यामुळे एक दिवस अधिकचा ठेवण्यात आला आहे. तसेच सामना ड्रॉ किंवा अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाणार आहे.

५) फॉलो ऑन नियम

जर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी फॉलो ऑनची गरज पडली तर हा नियम बदलला जाईल कारण अजून एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

 

हे होते बदललेले नवे नियम. आणखी कोणत्या नियमांत बदल व्हावा असे तुम्हांला वाटते?

सबस्क्राईब करा

* indicates required