computer

आनंद सिनेमाची पन्नाशी...'आनंद'चे हे १० डायलॉग आजही अमर आहेत !!

Subscribe to Bobhata

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेला चित्रपट ‘आनंद’ला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली. १२ मार्च १९७१ रोजी हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्याकाळात सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे कथानक, गाणी आणि त्यातील काही संवाद आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.  अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, हृषीकेश मुखर्जी, गुलजार अशा सगळ्या नामचीन कलाकारांनी एकत्र येऊन केलेला हा चित्रपट. कदाचित म्हणूनच पन्नास वर्षानंतरही या चित्रपटाची जादू तसूभरही ओसरलेली नाही.

एका कॅन्सर पेशंट, त्याचा शेवटचा प्रवास आणि त्याचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन या चित्रपटातून दिसून येतो. हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटासाठी हृषिदांच्या डोक्यात मुख्य भूमिकेसाठी किशोर कुमार यांना घ्यायचा विचार होता. त्यानंतर त्यांनी शशी कपूर आणि राज कपूर यांचाही विचार केला. शशी कपूर यांनी काही कारणाने नकार दिला आणि राज कपूर तेव्हा नुकत्याच मोठ्या आजारातून बरे झाले होते. चित्रपटाच्या शेवटी हिरो आनंद सहगल याचा मृत्यू होतो असे दाखवायचे होते. त्यामुळे स्वतः हृषिदांनाच राज कपूर यांना मरताना दाखवण्याची कल्पना रुचली नाही. कारण त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. चित्रपटात आलेला बाबुमोशाय हा शब्दही राज कपूर यांनीच दिलेला. ते हृषिदांना याच नावाने हाक मारत. चित्रपटातील हिरो देखील आपल्या डॉक्टर मित्राला त्याच नावाने हाक मारतो. हा शब्दही या चित्रपटामुळे अनेकांच्या मनावर कोरला गेला. 

 

शेवटी राजेश खन्ना यांनी स्वतःहून हृषिदांची भेट घेतली आणि हा चित्रपट करण्यास ते तयार असल्याचे सांगितले, पण हृषिदांनी त्यांच्यासमोर तीन अटी ठेवल्या. त्यातील पहिली अट होती सेटवर वेळेवर येणे, दुसरी होती तारखा बदलून मिळणार नाहीत आणि तिसरी अट होती फक्त एक लाख रुपये मानधनात काम करावे लागेल. राजेश खन्ना त्यावेळी इंडस्ट्रीतील सुपर स्टार होते. आठ लाखापेक्षा कमी मानधन ते स्वीकारत नसत. शिवाय, चित्रपटात राजेश खन्ना आहे म्हणजे चित्रपट चालणारच असेही एक समीकरण त्याकाळी बनले होते. पण मोठमोठ्या स्टार्सच्या हातून सुटलेला हा चित्रपट रजेश खन्नांना स्वतःच्या हातून सुटू द्यायचा नव्हता. आणि या तीनही अटी त्यांनी मान्य केल्या. केवळ ७ लाख रुपये मानधन घ्यायचं ठरलं. 

हृषीकेश मुखर्जी यांनी फक्त २८ दिवसात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. 

(हृषीकेश मुखर्जी)

या चित्रपटात आनंद सेहगल नावाचा एक आनंदी व्यक्ती दाखवली आहे. ज्याला आपला मृत्यू जवळ आला आहे हे माहित असतानाही हातात असलेल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आहे. भास्कर बॅनर्जी हा त्याचा डॉक्टर. ही भूमिका अमिताभ बच्चन यांनी निभावली आहे. अमिताभ बच्चन त्या काळी चित्रपट क्षेत्रात नवे होते. स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी झगडत होते. या चित्रपटानंतर मात्र त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांना खरे स्टारडम या चित्रपटाने मिळवून दिले.

या चित्रपटातील संवाद लिहिले आहेत गुलजार यांनी. यातील काही संवाद तर आजही जसेच्या तसे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

आज ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  आनंद मधील दहा डायलॉग देत आहोत. 

१. बाबुमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये...लंबी नहीं.

२. जब तक जिंदा हुँ तब तक मरा नहीं... जब मर गया साला मैं ही नहीं

३. हम अने वाले गम को खींच तान कर आज की ख़ुशी पे ले आते हैं... और उस ख़ुशी मैं जेहेर घोळ देते हैं

४. मानता हूँ की जिंदगी की ताकत मौत से ज्यादा बडी हैं... लेकीन ये जिंदगी क्या मौत से बत्तर नहीं

५. आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..

६. ये भी तो नही केह सकता...मेरी उमर तुझे लग जाये

७. कब, कौन, कैसे उठेगा... यें कोई नहीं बता सकता हैं

८. मौत तो एक पल हैं

९.

मौत तो एक कविता हैं
मुझसे एक कविता का वादा हैं मिलेगी मुझको
डूबती नब्जो में जब दर्द को निंद आने लगे...
जर्द सा चेहरा लिये चांद उफक तक पहुंचे
दिन अभी पानी में हो रात किनारे के करीब
ना अंधेरा, ना उजाला हो...न अभी रात, ना दिन...
जिस्म जब खतम हो और रूह को जाब सांस आये...
मुझसे एक कविता का वादा हैं मिलेगी मुझको

१०. बाबुमोशाय, जिंदगी और मौत उपर वाले के हात है| उसे न तो आप बदल सकते है हा मैं| हम सब तो रंगमंच की कठपुतालीयाँ हैं जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी है|

१९७१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याकाळी १.७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. यामध्ये राजेश खन्ना, अमिताभ बच्चन सोबत सुमिता सान्यालनेही काम केले आहे. 
तुम्हालाही हा चित्रपट आवडतो का? आवडत असेल तर त्यामागचे कारण कमेंटच्या माध्यमातून आमच्याशी जरूर शेअर करा.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required