computer

इरफान खानच्या अभिनयाने गाजलेले १० चित्रपट!!! यांतला तुमचा आवडता सिनेमा कोणता??

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा दोन्ही चित्रपट सृष्टींमध्ये तेवढ्याच ताकदीने काम केलेल्या अभिनेत्यांची नावे काढायची झाली तर त्यात अग्रस्थानी इरफान खानचं नाव असेल. एका बाजूला मकबूल, पान सिंग तोमर, लंचबॉक्स, पिकू, तलवार, सारखे भारतीय चित्रपट तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे स्लमडॉग मिलेनियर, लाईफ ऑफ पाय, ज्युरासिक पार्क, द अमेझिंग स्पायडरमॅन, इन्फर्नो हे चित्रपट. इरफान खानच्या करियर ग्राफकडे बघितल्यावर त्याच्यासारखा दुसरा भारतीय अभिनेता आठवत नाही. 

सुरुवातीला इरफानने चाणक्य, भारत एक खोज, मानो या मानो सारख्या मालिकांमधून इरफानने काम केलं. १९८८ साली आलेल्या सलाम बॉम्बे चित्रपटापासून त्याच्या चित्रपटातील कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्याने छोटेमोठे अनेक सिनेमे केले. मकबूल हा त्याच्या करियरला वेगळी दिशा देणारा चित्रपट ठरला. त्याच दरम्यान नवाजुद्दिन सिद्दिकी आणि त्याची एक शॉर्टफिल्मही आली. दुर्दैवाने २००३ साली त्या शॉर्टफिल्मकडे कोणी ढुंकूनही बघितलं नव्हतं. आज ती फिल्म युट्युबवर ६० लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितली आहे.

पान सिंग तोमर हा इरफान खानच्या करियरमधला पुढचा टप्पा होता. त्यानंतर लाईफ ऑफ पाय, द लंचबॉक्स, हैदर, पिकू या सिनेमांनी त्याच्या कारकीर्दीचा आलेख चढताच राहिला. पाश या पंजाब मधल्या एका महत्त्वाच्या क्रांतिकारक कवीवर बनणाऱ्या चित्रपटात इरफान खानची मुख्य भूमिका असणार होती. काही कारणांनी चित्रपट बनू शकला नाही.

अशा या अत्यंत गुणी अभिनेत्याचं २९ एप्रिल २०२० साली निधन झालं. इरफान खानला २०१८ साली ‘न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर’ हा दुर्मिळ आजार असल्याचं निदान झालं होतं. २०१९ च्या दरम्यान तो या आजारातून बरा झाला होता. त्याने अंग्रेजी मिडीयम हा चित्रपटही केला. पण त्याचं आजारपण पूर्ण बरं झालं नव्हतं. २८ एप्रिल रोजी त्याला कॉलोनल इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अखेर या आजाराशी लढता लढता त्याचा मृत्यू झाला.

आजच्याच दिवशी भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एक तारा निखळला होता. त्यानिमित्ताने आज इरफान खानने गाजवलेले १० चित्रपट पाहूया...

१. मकबूल

२. लाईफ ऑफ पाय

३. मदारी

४. तलवार

५. हैदर

६. हिंदी मिडीयम

७. ब्लॅकमेल

८. पिकू

९. पान सिंग तोमर

१०. लंचबॉक्स

यांतला तुमचा आवडता सिनेमा कोणता??

सबस्क्राईब करा

* indicates required