computer

येत्या काळात येऊ घातलेले १० भन्नाट बायोपिक्स !!!

अजहर, एम. एस. धोनी, दंगल, सरबजीत अशा लागोपाठ आलेल्या बायोपिक्सनंतर बॉलीवूड मध्ये जणू बायोपिकचा नवा ट्रेंडच आलाय. दाउदची बहिण हसीना पारकर ते पद्मावती, गुलशन कुमार, संजय दत्त, अरुण गवळी अशा एकसे एक भन्नाट बायोपिक्सने  येणारं पूर्ण वर्ष भरलं आहे. यावरून २०१७ ला आपण बायोपिक्सचं वर्षही म्हणू शकतो. पण मंडळी, यादी या वर्षापुरतीच संपत नाही बरं का! लिस्ट बडी लांबी हे जानी....

चला तर मग या वर्षात कोणते कोणते बायोपिक्स येत आहेत यावर एक नजर टाकूयात...

१. डॅडी !

 अरुण गवळीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट यावर्षी म्हणजे २०१७ साली प्रदर्शित होईल. अर्जुन रामपालच्या करियर मधली सर्वात वेगळी भूमिका म्हणून याकडे बघितलं जात आहे.



वाचा :

आला 'डॅडी' चा फर्स्ट टिझर : फुल्ल डेंजर दिसतोय अरूण गवळी

२. पद्मावती !

दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शाहीद कपूर अशा स्टार कास्टने सजलेला आणि आणि कॉन्ट्रोवर्सीत अडकलेला हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. राजस्थानातली भन्साळीला झालेली मारामारी आणि आताची कोल्हापुरातली आग अशा सगळ्या संकटांतून तरला तर हा सिनेमा येत्या १७ नोव्हेंबर २०१७ ला रिलीज होऊ शकेल.

३. हसीना !

दाउद इब्राहीमच्या बहिणीच्या आयुष्यावर बेतलेला या सिनेमात श्रद्धा कपूर हसीना पारकर हिच्या भूमिकेत दिसणार आहे.  ही हसीनासुद्धा म्हणे चांगलीच जहांबाज बाई होती आणि तिचा दाऊदवर भलताच प्रभाव होता. १४ जुलै २०१७ रोजी सिनेमा रिलीज होईल. श्रद्धा कपूरचा निगेटिव्ह-ग्रे शेडचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. 

कलाकार आजकाल वेगवेगळे प्रयोग करायला कांकू करत नाहीत हे ही सध्याचं एक चांगलं लक्षण आहे.

४. पॅडमॅन !

दक्षिण भारतातल्या अरूणाचलम मुरूगानंदम यांनी मासिक पाळीच्या दरम्यान वापरले जाणारे पॅड्स चांगल्या दर्जाचे आणि स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून खूप वर्षे प्रयत्न केले. यात त्यांनी वेगवेगळी मटेरियल्स वापरून पाहिली. पण तयार झालेलं प्रॉडक्ट चांगलं झालं आहे की नाही हे पाहायला त्यांच्याकडे उमेदवार नव्हते. त्यांनी स्वत:वर, बायकोवर आणि बहिणींवर मग त्याचे प्रयोग केले. पण ही गोष्टच इतकी विचित्र आहे की त्यामुळं त्यांची बहिण दुरावली आणि बायकोही सोडून गेली. 

पण अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हे सॅनिटरी पॅड्स सध्या अनेक संस्थांतून बनवले जात आहेत. अरूणाचलम यांची मोडक्यातोडक्या इंग्रजीमधून होणारी टेड टॉक्स मुळातून पाहाण्यासारखी आहेत. ‘पॅडमॅन’ हा अरुणाचलम् मुरुगानंदम् यांचा चरित्रपट असणार आहे. सिनेमात अक्षयकुमार, राधिका आपटे अणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत असतील.

५. सचिन – अ बिलियन ड्रीम्स !

क्रिकेटचे चाहते ज्या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत तो सिनेमा म्हणजे ’सचिन – अ बिलियन ड्रीम्स”येत्या २६ मे २०१७ ला प्रदर्शित होत आहे.
मग फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार ना ?

वाचा :
ऐका हो ऐका! सचिनच्या सिनेमाच्या रिलीजची तारीख आलीय...

 

६. संजय दत्त !

राजू हिरानी पुन्हा एकदा सिनेमाचा तड़का मारायला येतोय. पण यावेळी आपल्या लाडक्या मित्राच्या जीवनावर आधारित सिनेमा घेऊन. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाचं नाव मात्र अजून ठरलेलं नहीं. रणबीर कपूर या सिनेमात संजूबाबाच्या रोल मध्ये दिसेल. त्याचे काही फर्स्ट लूक्स इंग्रजी पेपर्समधून प्रसिद्ध झाले होते. त्या लूक्समध्ये तो हुबेहूब संजूबाबा दिसतो.

७. 'सआदत हसन मंटो' या लेखकाच्या जीवनावरील चित्रपट !

सआदत हसन मंटो यांना काळाच्या पुढचा लेखक म्हटलं तरी वावगं ठरू नये. फाळणीपूर्व भारत-पाकिस्तान आणि फाळणीच्या कथा त्यांच्या लेखनात प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या कथा जास्त सशक्त की त्यातली पात्रं, हे सांगता येणं अशक्य आहे.

अभिनयाची फॅक्ट्री म्हणून ओळख असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी आता 'सआदत हसन मंटो' या लेखकाच्या एका नव्या रुपात आपल्याला पडद्यावर दिसणार आहे. सिनेमा अजून तयार होण्याच्या मार्गावर आहे पण त्याआधीच नवाजुद्दिन मंटोच्या रोलमध्ये पूर्ण घुसलाय हे हाती येणार्‍या काही बातम्यांमधून दिसून येतंय. गंमत म्हणजे मंटोचीच एक कथा ’टोबा टेक सिंह’ हिच्यावरतीही याच वर्षी सिनेमा येणं अपेक्षित आहे. त्यात टोबा टेक सिंहची भूमिका पंकज कपूर करत आहे. 

८. मोगल !

संगीताचा बादशहा - गुलशनकुमारची कहाणी अक्षय आपल्यासाठी घेऊन येत आहे. अक्षयचा हा दुसरा बायोपिक असणार आहे.


वाचा :

टी-सिरीज चा बादशहा - गुलशन कुमार !!!

९. इंदू सरकार !

नावावरून आपल्याला अंदाज आला असेलच हा सिनेमा कोणाच्या जीवनावर आधारित आहे. आणीबाणीच्या काळावर भाष्य करणारा हा सिनेमा इंदिरा गांधी यांचे चरित्र असेल. यात सुप्रिया विनोद इंदिरा गांधींचं काम करत आहे तर नेल नितीन मुकेश संजय गांधींचं. सुप्रियानं यापूर्वीही एका नाटकात इंदिरा गांधींची भूमिका केलीय. प्रसिद्ध मेकअपमन विक्रम गायकवाड यांनी त्यांना हुबेहूब इंदिरांचं रूप दिलं होतं. या सिनेमाचे वेशभूषाकारही कदाचित तेच असण्याची शक्यता आहे. नील नितिन मुकेशचे या सिनेमातले काही फोटोज प्रसिद्ध झाले होते. सूरत तर त्यांनी नेमकी साधलीय आता ऍक्टिंगच्या नावानं तो काय करतो हे पाहूच.

१०. गोल्ड !

पुन्हा एकदा अक्षय आपल्याला एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. बलबीर सिंह या हॉकी खेळाडूवर आधारित हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

 

 

तर  तुम्ही कोणत्या बायोपिकची आतुरतेने वाट बघत आहात ?..सांगा सांगा....!!!

सबस्क्राईब करा

* indicates required