मनमोहन सिंग सरकारवर प्रकाश टाकणारा 'दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'......ट्रेलर पाहून घ्या !!

Subscribe to Bobhata

काल बाळासाहेबांच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज झाला आणि आज मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित “दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. येणारं वर्ष हे बायोपिक्सचं वर्ष असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

स्रोत

हा चित्रपट दोन व्यक्तींचा आहे. पहिली व्यक्ती मनमोहन सिंग आणि दुसरी व्यक्ती म्हणजे संजय बारू. संजय बारू हे मनमोहन सिंग यांचे सल्लागार होते. त्यांनीच ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हे पुस्तक लिहिलं. चित्रपटाची कथा त्यांच्याच नजरेतून दाखवण्यात आली आहे.

संजय बारूच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. काही वर्षांपर्यंत अक्षय खन्ना दुर्मिळ झाला होता. नाही म्हणायला त्याने ढिशुम, इत्तेफाक आणि मॉम या सारखे सिनेमे केले, पण तो फारसा लक्षात राहिला नाही. या चित्रपटात त्याला त्याचं नाणं खणखणीत वाजवण्याची पूर्ण संधी मिळाली आहे.

‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मधले अक्षय खन्नाचे काही सिन्स हे अमेरिकन टीव्ही सिरीज ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ची आठवण करून देतात. ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ मध्ये मुख्य पात्र थेट प्रेक्षकांशी संवाद साधतं. या चित्रपटात हे काम अक्षय खन्ना करतोय. संजय बारूच्या भूमिकेत आहे म्हणजे सगळी सूत्रं त्याच्याच हातात असणार हे ओघाने आलंच. याशिवाय टीव्ही सिरीज आणि या चित्रपटात आणखी एक साम्य आहे. दोघांचे कथानक राजकारणाभोवती फिरतात.

अनुपम खेर यांच्या अभिनयाबद्दल न बोललेलंच बरं. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत ते अगदी फिट बसले आहेत. फक्त मेकअपचा थर थोडा कमी केला असता तर बरं झालं असतं असं ट्रेलर पाहताना जाणवतं.  

कथानकाबद्दल आम्ही काहीही सांगणार नाही त्यासाठी तुम्हीच हा ट्रेलर पाहा. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required