पब्जी बंद होणार?? इथं वाचा खरी माहिती..

राव, पब्जी (PUBG) बंद होणार. बातमी ऐकली ना ? सध्या सोशल मिडीयावर एक नोटीस फिरत आहे. या नोटीस द्वारे पब्जीमुळे मुलांवर होणाऱ्या वाईट संस्कारांबद्दल सांगण्यात आलंय. हे लक्षात घेऊन काही देशांनी पब्जी बॅन केलाय म्हणे. त्या प्रमाणेच भारतातही पब्जी बॅन होणार असं ही नोटीस सांगते. पण हे खरंय का ? चला समजून घेऊ....
मंडळी, ज्या प्रकारे मिस्टर बिन मेला असं खोटं खोटं पसरवता येतं तसंच पब्जी बॅन होणार हेही पसरवता येतं. व्हायरल होणाऱ्या या नोटीस कडे नीट बघा. या नोटीस मध्ये शेवटी हायकोर्ट महाराष्ट्र लिहिलंय. महाराष्ट्रात महाराष्ट्र हायकोर्ट नसून मुंबई हायकोर्ट आहे. याशिवाय ज्या पदावरील माणसाने खाली सही केली आहे ते ‘Prejudge’ हे पद अस्तित्वातच नाही. याखेरीज नोटीस मध्ये इंग्रजी व्याकरणाच्या अनेक चुका आहेत ज्या सरकारी नोटीस मध्ये तरी पाहायला मिळत नाहीत.
मंडळी, हे तर उघड आहे की ही बातमी खोटी आहे. आज जवळ जवळ भारतातली तब्बल ६२ टक्के जनता पब्जी खेळते. काही लोक तर आठवड्यातून ८ तास पब्जी खेळण्यात घालवतात. पब्जीच्या वाढत्या लोकप्रियतेसोबत अशा अफवा या येणारच.
तर, पब्जीमुळे आर्मी जॉईन केलेल्या जवानांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणीही तुमचं पब्जी हिरावून घेणार नाहीय.
आणखी वाचा :
मिस्टर बिनच्या मृत्यूची बातमी आली तर लगेच डिलीट करा...कारण जाणून घ्या भाऊ !!
युनेस्कोने मोदींची निवड बेस्ट पी. एम म्हणून केली आहे या अफवेला तुम्ही बळी पडलात ना?
दिसतं तसं नसतं : सावधान आता असे बनवले जातील फेक व्हिडीओ !!
तुम्हाला व्हॉट्सऍप गोल्डला अपग्रेड करा असा मेसेज आलाय का? त्या मेसेजकडे ताबडतोब दुर्लक्ष करा..