अक्षय कुमार नंतर अजय देवगण बनलाय इन्कमटॅक्स ऑफिसर...सिनेमाचा ट्रेलर बघून घ्या राव !!

अजय देवगण त्याच्या सिंघम स्टाईल मध्ये पुन्हा एकदा बघायला मिळेल असं दिसतंय, पण यावेळी त्याच्या अंगावर तो सिंघमचा युनिफॉर्म नसेल असं दिसतंय. हे आम्ही नाही त्याचा आगामी ‘रेड’ (Raid) सिनेमाचं पोस्टर सांगतय राव.

Raid म्हणजे धाड घालणे. नावावरूनच दिसतंय की अजय देवगण या सिनेमात इन्कमटॅक्स ऑफिसरच्या रुपात दिसेल. पोस्टर मध्येच दिसत असल्याप्रमाणे तो काळ्यापैश्याच्या मधोमध बसलेला दिसत आहे.

सिंघम सिरीज, संडे, एलओसी, झमीर, गंगाजल, अश्या सिनेमांमध्ये त्याने या प्रकारचे रोल केले आहेत मग तो यात काय नवीन करणार हे बघण्यासारखं असेल. अजय शिवाय आणखी एक तगडा अभिनेता या सिनेमात दिसणार आहे. तो म्हणजे सौरभ शुक्ला. जॉली एल.एल.बी मध्ये त्याने कमाल केली होती. या सिनेमात अजय आणि सौरभ शुक्ला ची जुगलबंदी जर असेल तर आणखी मजा येईल यात शंकाच नाही.

...पण सिनेमा या अपेक्षा पूर्ण करेल का ? तूर्तास या सिनेमाचा ट्रेलर आला बघून घ्या राव.

 

आणखी वाचा : 

सिनेमातली नाही, अशी असते खरीखुरी सीबीआयची रेड !!

सबस्क्राईब करा

* indicates required