जाणून घेऊया एलआयसी च्या कॅन्सर कव्हर पॉलिसी बद्दल !!

४ फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) म्हणून ओळखला जातो. आज भारतात २५ लाखापेक्षा जास्त लोक कॅन्सरशी लढा देत आहेत. असं म्हणतात की प्रत्येकी ८ मिनिटाला कॅन्सरमुळे एका स्त्रीचा मृत्यू होतो. लोकांमध्ये कॅन्सर विषयी जागृती यावी म्हणू ४ फेब्रुवारी आणि पुढील आठवडा ‘कॅन्सर अव्हेर्नेस विक’ म्हणून पाळला जातो.

मंडळी घरातल्या एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर सर्वात आधी चिंता लागते ती म्हणजे पैश्यांची. कॅन्सरचा उपचार हा काही लाखांमध्ये जातो मग अश्यावेळी आपल्या साठवलेल्या पैश्यांवर कात्री लागते. पण हे पैसे किती दिवस पुरणार ? सर्वसामान्यांना कॅन्सरचा खर्च उचलता येणार कसा ?

मंडळी आज जाणून घेऊया एलआयसी च्या कॅन्सर कव्हर पॉलिसी बद्दल जी तुम्हाला कॅन्सर सारख्या आजाराशी लढण्यासाठी आर्थिक आणि मानसिक बळ देते.

स्रोत

१. एलआयसीची कॅन्सर केअर पॉलिसी कमीत कमी वय वर्षे २० वर्षापासून ते ६५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे.

२. या पॉलिसी मध्ये तुम्हाला १० लाख ते ५० लाख पर्यंत खात्रीशीर रक्कम मिळेल.

३. कॅन्सरचे रोग निदान व प्राथमिक अवस्थेत खात्रीशीर रकमेच्या २५ % रक्कम एकरकमी मिळेल. शिवाय पुढील ३ वर्ष विम्याचा हफ्ता भरायची आवश्यकता नाही.

४. जेव्हा कॅन्सर गंभीर अवस्थेत असेल तेव्हा खात्रीशीर रकमेच्या ७५% रक्कम एकरकमी मिळेल. शिवाय त्यानंतर विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही.

५. तुम्हाला मिळणाऱ्या खात्रीशीर रकमेच्या १ टक्का रक्कम प्रती महिना १० वर्ष मिळत राहील.

६. या पॉलिसीमध्ये २ पर्याय आपल्याला मिळतात :

१. खात्रीशीर विमा रक्कम ही कायम राहते.

२. पुढील ५ वर्ष अथवा विमाधारकाचे कॅन्सर निदान होई पर्यंत दरवर्षी खात्रीशीर रकमेच्या १०% दरसाल वाढ होत राहील.

 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा :

अमेय वैद्य

मो. नं. : ९९६९७६१२८१

इमेल : [email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required