'युपी के मायीक टायसन' - मुक्काबाज चा ट्रेलर बघितला का राव ?

वेगळ्या धाटणीचे सिनेमे देणारा दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ त्याचा नवा सिनेमा घेऊन आलाय राव. बॉलीवूड म्हटलं की जे एक चित्र आपल्या डोळ्या समोर उभं राहतं त्याच्या अगदी विरुद्ध सिनेमे अनुराग कश्यप देत आला आहे. मंडळी त्याच्या दर्जेदार सिनेमा पाहून आता तो नवीन काय करणार असा प्रश्न पडलेलाच, त्याचं उत्तर आज मिळालंय. बऱ्याच दिवसानंतर एक दमदार सिनेमा पाहायला मिळणार असं दिसतंय राव. हा सिनेमा आहे ‘मुक्कबाज’...नुकताच याचा ट्रेलर लाँच झाला. तो तुम्ही खाली बघू शकता.

मुक्काबाज मध्ये एका बॉक्सरची लव्ह स्टोरी दिसणार आहे. हा बॉक्सर स्वतःला उत्तर प्रेदेशचा मायीक टायसन म्हणवतो, प्रेमात सुद्धा पडतो आणि नको तिथे पंगे घेतो. मग पुढे जे घडतं ते तुम्हाला ट्रेलर मधून अंदाज येईलच. ही एवडी साधी सरळ लव्ह स्टोरी असेल असं वाटत नाही. ट्रेलर मध्ये असलेली झलक पूर्ण सिनेमा काय असेल याची उत्सुकता लावून जाते.

सिनेमा दमदार बनवण्याचं मुख्य काम केलंय जिमी शेरगिल या पठ्ठ्याने. त्याचे डोळे जे बोलतात ते अभिनयाच्या पलीकडचं आहे भाऊ. मुख्य भूमिकेतील 'विनीत कुमार सिंह' सुद्धा भाव खाऊन जातो. विनीत कुमारने या आधी अनुरागच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मध्ये काम केलं होतं. त्या सिनेमातील त्याच्या अभिनयात आणि मुक्काबाज मधला अभिनयात खूप मोठा फरक दिसतोय भाऊ.

एकंदरीत सिनेमा बघण्यासारखा असेल आणि खूप दिवसानंतर अनुराग कश्यपचा नवीन तडका अनुभवायला मिळेल. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा !!

सबस्क्राईब करा

* indicates required