'कौन बनेगा करोडपती’ च्या पडद्यामागची १२ गुपितं !!

आज ‘दी अमिताभ बच्चन’ यांचा वाढदिवस आहे आणि याच दरम्यान ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो देखील पूर्ण फॉर्ममध्ये आहे. राव, हा शो आणि त्यातून करोडो जिंकून बाहेर पडणारे लोक यांच्याबद्दल नेहमीच कुतूहल असतं. आपण त्या खेळत जिंकू की नाही याबद्दल शंका असली तरी अमिताभ बच्चन यांना ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची संधी मिळते, हे काय कमी आहे?

भाऊ, आज या महानायकाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत ‘कौन बनेगा करोडपती’ च्या पडद्यामागच्या १२ छुप्या गोष्टी!!


१. समोर अमिताभ बच्चन उभे आहेत आणि तुम्हाला त्यांच्याशी ‘शेक हँड’ करण्याची इच्छा झाली तर तसं करता येत नाही. त्याचबरोबर चित्रिकरणाच्या ठिकाणी साधा पेनही घेऊन जाण्यास मनाई आहे,  त्यामुळे ऑटोग्राफचा प्रश्नच येत नाही.

स्रोत

२. बिग बी आल्या आल्या आपल्या केबिनमध्ये जातात, तिथे त्यांना स्पर्धकांबद्दल सर्व माहिती दिली जाते. हे सगळं सुरु असताना स्पर्धकांना मेकअप आणि कपडे-चढवून स्क्रीन समोर जाण्यास तयार केलं जातं.

३. अमिताभ बच्चन जे काही स्क्रीन समोर बोलतात त्याची पटकथा आधीच तयार केलेली असते. अमिताभ ते फक्त ‘टेलीप्रॉम्पटर’ वर बघून बोलत असतात. हा टेलीप्रॉम्पटर कॅमेऱ्याच्या ठीक बाजूलाच ठेवलेला असतो.

स्रोत

 

४. ‘कौन बनेगा’ शो चा सेट आपल्याला टापटीप आणि शांततामय वाटत असलं तरी शुटिंग दरम्यान कावळ्यांचे आवाज, गाड्यांचे आवाज, आरडाओरड यामुळे अनेकदा शूट मध्येच बंद पडतं. 

५. ‘काम्पुटर जी’ जो प्रश्न स्क्रीन वर दाखवतात तो खरं तर केबिनमध्ये बसलेला त्यांचाच एक माणूस पाठवत असतो. (चित्रीकरण ठिकाणी गेल्यास या खऱ्या ‘काम्पुटर जी’ ला साक्षात बघता येऊ शकतं.)


६. जिंकल्यानंतर जी रक्कम आपल्याला चेकवर दिसते ती टॅक्स वजा करण्यापूर्वीची रक्कम असते. यावर ३१% पर्यंत कर आकारला जातो.

स्रोत


७. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ मध्ये जे जिंकतात त्यानंतर एक मोठा ब्रेक घेण्यात येतो. तुम्ही जर नीट पाहिलंत तर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट होताना काम्पुटर समोर २ खुर्च्या नसतात पण जेव्हा स्पर्धक निवडला जातो,  तेव्हा तिथे अचानक दोन्ही खुर्च्या प्रकट झालेल्या असतात. यामागील कारण म्हणजे त्या विजेत्याला मेकअप करून पुढील खेळासाठी तयार करण्यास घेतलेला मोठा ब्रेक.

८. प्रेक्षकांना टाळ्या वाजवणे आणि हसण्यापलीकडे काहीही करू दिलं जातं नाही आणि धक्कादायक म्हणजे ऑडीयंस पोल’ मध्ये प्रेक्षक स्वतः उत्तरे देत नाहीत. प्रत्येक उत्तराला शो वाल्यांची ठरलेली टक्केवारी असते जी ऑडीयंस पोलच्या नावाखाली दाखवली जाते.


९. फोन-अ-फ्रेंड मध्ये ज्या ४ मित्रांना आपण फोन करतो त्यांना पूर्वीच कळवण्यात आलेलं असतं की बाबांनो, जिथे आवाज नसेल अशा जागेत गुपचूप बसा, कधीही बिग बी चा फोन येऊ शकतो.

स्रोत


१०. शो मध्ये जाऊन आलेले सांगतात त्याप्रमाणे अमिताभ बच्चन शुटिंगचं वातावरण आपल्या विनोद बुद्धीने जमेल तेवढं खेळकर ठेवतात.

११ हा शो रिऍलिटी शो असला तरी यात रिऍलिटी तशी कमीच आहे राव. जे स्पर्धक तिथे आलेले असतात त्यांच्यावर एक लहान डोक्युमेंट्री बनवण्यात येते, ज्यात दाखवलं जातं की स्पर्धक किती कष्टाळू व गरीब आहे आणि परिस्थितीशी कसा झगडतोय. यात अनेकदा तथ्य नसतं. काहीवेळा चित्रफितीत दाखवलेलं त्यांचं घर, आजूबाजूची माणसे हा उभा केलेला सेट असतो. 

स्रोत


१२. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे ‘घर बैठो लखपती’ मध्ये अमिताभ बच्चन शुटिंग दरम्यान एखाद्याला फोन लावतात पण आपल्याला टीव्ही वर असं दाखवण्यात येते की अमिताभ शो दरम्यान विजेत्याला फोन लावत आहेत. पण जर शुटींग पूर्वीच झाली आहे, तर रात्री शो सुरु असताना प्रश्नांची उत्तरे देऊन काय उपयोग? याचाच अर्थ ज्या माणसाला फोन लावतात तो त्यांच्याच टीमपैकी एकजण असतो.


मंडळी जे दिसतं ते नसतं, म्हणूनच जग फसतं !!!

सबस्क्राईब करा

* indicates required