'अ ब्यूटीफुल माईंड' : जागतिक मानसिक आरोग्य दिना निमित्त पाहूयात एका नोबेल विजेत्याची मानसिक लढाई !!

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. मानसिक म्हटल्यावर ' वेडा' हा एकच भाव आपल्या मनात येतो. वेड -खूळ -उन्माद -अपस्मार हे सगळे एकच आहे असे एके काळी समजले जायचे. दैवी प्रकोपाचा हा परिणाम आहे असेही समजले जायचे. भूत पिशाच्चाची बाधा हे वेडाचे मूळ कारण समजले जाण्याचे दिवस आता संपत आले आहेत. मानसशास्त्रज्ञांनी यावर सखोल अभ्यास करून उपचाराचे अनेक मार्ग शोधले आहेत. उपचार यशस्वी होण्यासाठी एक मोठा अडथळा असा आहे की आपण सर्वजण आपल्या मनाला गृहीत धरून चालतो. त्यामुळे लक्षणे नजरेस येऊनही नजरेआड केली जातात. नुकत्याच केलेल्या एका पहाणीनुसार ऑफीस मध्ये काम करणार्‍या पाचापैकी एका कर्मचार्‍याला मानसिक दुर्बलेतेचा त्रास असू शकतो.

स्रोत

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज आम्ही तुमची एका चित्रपटाशी ओळख करून देत आहोत. 'ब्यूटीफुल माईंड'  हा चित्रपट ‘जॉन नॅश’ या अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषक विजेत्या एका गणितज्ञाच्या आयुष्याची सत्यकथा आहे. हा चित्रपट याच नावाच्या ‘सिल्व्हिया नासर’ यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारीत आहे.

 

आपण सर्वात आधी जाणून घेऊया जॉन नॅश हे कोण होते.

जॉन नॅश हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ होते. त्यांची गेम थियरी जगभरात प्रसिद्ध आहे. गणिताच्या सहाय्याने त्यांनी व्यवस्थांना हाताळण्याच्या शक्याशक्यतांची सैद्धांतिक मांडणी केली. यालाच गेम थियरी म्हणतात. याच थियरीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आश्चर्य म्हणजे एका गणितज्ञाला अर्थशास्त्राचं नोबेल पहिल्यांदाच मिळालं आहे. पण त्यांचे संपूर्ण आयुष्य एका मानसिक विकाराने झाकोळून गेले होते. ‘Paranoid schizophrenia’ च्या आजाराने आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत त्यांना छळले होते. नोबेल पुरस्कार मिळण्यापूर्वी या आजाराच्या मगरमिठीतून ते बाहेर पडले होते. 'ब्यूटीफुल माईंड'  हा त्यांचा जीवनपट आहे.

 

चित्रपटचं कथानक :

आता वळूया चित्रपटाकडे. चित्रपटाची सुरुवात जॉनच्या कॉलेजपासून होते. मुलींच्या एका घोळक्याकडे बघून जॉन आणि त्याचे मित्र मुलींना ‘डेट’साठी कसे विचारायचे याची चर्चा करत असतात. जॉन ही समस्या गणिती फॉर्म्युल्याने सोडवतो.

स्रोत

 

यानंतर त्याचा एक लेख आंतरराष्ट्रीय मान्यता पावतो आणि त्याला एम. आय. टी. मध्ये संशोधनास बोलावले जाते. तिथे पेंटॉगॉन या अमेरिकन लष्करीसंस्थेतर्फे काही सांकेतिक भाषेतील संदेश सोडवण्यासाठी त्याला पाचारण करण्यात येते. त्याच्यासारखे अनेक तज्ञ ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. जॉन हे सगळे संदेश सर्वासमक्ष तोंडी सोडवतो.

स्रोत

स्रोत


एम. आय. टी. मध्येच त्याला त्याची जीवनसाथी अॅलिशिया भेटते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करतात. आणि यानंतर सुरु होतात schizophrenia चे काळे दिवस. जॉनला गुप्तहेर भेटायला येतात.

स्रोत


प्रॅचर नामक इसम आणि रशियन एजंट्स मधील चकमक बघितल्या नंतर जॉनला जीवाची भीती वाटू लागते. प्रॅचर त्याला या मिशनमध्ये आपल्या बरोबर राहण्यासाठी ब्लॅकमेल करू लागतो. त्यानंतर मात्र त्याला जिथे तिथे रशियन सैनिक त्याचा जीव घ्यायला टपलेले दिसू लागतात.

स्रोत

 

जॉन एका माणसाला एजंट समजून मारतो.  या घटनेनंतर मात्र जॉनच्या वागणूकीचं गांभीर्य वाढतं आणि त्याला मानसोपचारतज्ञाकडे नेलं जातं. चार्ल्स, मर्सि आणि प्रॅचर हे त्याला छळणारे ३ एजंट हे फक्त त्याच्या विचारांमध्ये असल्याचं डॉक्टर त्याला सांगतात. Schizophrenia आजाराने ग्रासला असल्याने त्याला असे भास होत असतात.

स्रोत

स्रोत


त्याच्यावर उपचार सुरु होतात. जॉन उपचारादरम्यान कोणाच्याही नकळत औषधे घेण्यास थांबवतो. त्यामुळे त्याला प्रॅचर पुन्हा दिसू लागतो. पुन्हा एकदा जॉनचं प्रॅचरच्या मिशनवर काम करणं सुरु होतं. एका घटनेनंतर जॉनला कळून चुकतं की आपल्याला Schizophrenia झाला आहे.

स्रोत


१९७० पर्यंत जॉनमध्ये सुधारणा होऊ लागते आणि तो प्राचार्य म्हणून काम करू लागतो. १९९४ साली त्याने तयार केलेल्या गेम थियरीसाठी त्याला अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

स्रोत

स्रोत

स्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required