तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील 'हे' पात्र शो सोडून जात आहे !

कौटुंबिक विनोदी मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ देशभरात प्रचंड गाजली. भारताच्या विविध भागातील माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांनी उचलून धरलं. याच मालिकेतून घराघरांत पोहोचलेलं सर्वांच लाडकं पात्र म्हणजे ‘टिपेंद्र जेठालाल गडा’ उर्फ ‘टपू’.

भव्य गांधी या बाल कलाकारानं हे पात्र आजतागायत साकारलं. याच मालिकेत त्याला आपण लहानाचं मोठं झालेलं पाहिलं आहे पण आता मात्र भव्य या मालिकेत दिसणार नाहीये. त्याने तारक मेहता का उलटा चष्मा सोडायचं ठरवलं आहे. भविष्यात नवीन संधी शोधण्यासाठी शो सोडत असल्याचं कारण भव्यच्या आईने सांगितलं आहे.

’टपू’ या पत्रासाठी भाव्याशिवाय आपण कोणाचाच विचार करू शकत नाही एवढं त्या पत्राने आपल्या मनात घर केलेलं आहे. आपण सारेच त्याला मिस करू.

सबस्क्राईब करा

* indicates required