सूर्यवंशम मधला हा लहान मुलगा आठवतोय का ? १८ वर्षानंतर तो आता असा दिसतो !!

मंडळी सूर्यवंशम चं नाव घेऊन तुम्हाला बोर करायचं नव्हतं....पण पण...आठवण काढण्याचं एक निमित्त झालं आहे. राव सोनी वाल्यांनी सुर्यवंशम इतक्या वेळा दाखवलाय की आपण डोळे बंद करून हिरालालचे डायलॉग बोलू शकतो म्हणून ही आठवण काढली....असो....

स्रोत

तर, मुद्दा असा आहे की सूर्यवंशम मध्ये जो हिरा ठाकूरचा जो मुलगा दाखवला आहे तो तुम्हाला आठवतो का ? अरे तो नाही का जो ‘जहरवाली खीर’ आपल्या (दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन) आजोबाला आणून देतो ? हा तोच तो....काय आहे ना ही फिल्म आली १९९९ ला त्यावेळी हा मुलगा लहान होता. पण आता १८ वर्षानंतर त्याचा लुक पूर्ण बदललाय ना भाऊ....आता तुम्हीच बघा तो कसा दिसतो...

स्रोत

मंडळी, या लहान मुलाचं नाव आहे "आनंद वर्धन". आता तो एक तेलगु नट आहे. त्याने आपल्या करीयरची सुरुवात 'चाईल्ड आर्टिस्ट' म्हणून केली. १९९८ मध्ये आलेल्या ‘सूर्यवन्सम’ या तेलगु सिनेमाचा हिंदी रिमेक तयार होत असताना आनंदची वर्णी अमिताभ बच्चन यांच्या मुलाच्या रोलसाठी लागली. यांनंतर त्याने अनेक चित्रपटात काम केलं...या सगळ्यात तो सुर्यवंशम मधला गोंडस बाळ राहिला नसून हँडसम हंक झाला आहे...आम्ही काय सांगत बसलोय...तुम्हीच बघा !!

स्रोत

स्रोत

स्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required