computer

बच्चन काकांचं ट्विटर अकाऊन्ट हॅॅक झालंय भाऊ...नक्की कोणाचं काम आहे हे ??

बॉलिवूड सेलेब्रिटी जर कुठे व्यक्त होत असतील तर ते ठिकाण म्हणजे ट्विटर!! बॉलिवूडचे सगळे सितारे झाडून ट्विटरवर आपले मत मांडत असतात. मंडळी सहसा या सिताऱ्यांचे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामचे अकाऊंट त्यांची मॅनेजमेंट सांभाळत असते. पण ट्विटर मात्र ते स्वतः सांभाळत असतात. ट्विटर अनेक अर्थाने व्यक्त व्हायला चांगले माध्यम आहे राव!! अत्यंत मोजक्या शब्दात हवे त्या विषयावर व्यक्त होता येते. आणि ट्विटरवर व्यक्त केलेली मते लगेच मिडियावर सुद्धा यायला लागतात. फेसबुक सारखी गर्दी तिथे नसल्याने फेसबुकवर जसे रिकाम्या कमेंट्सचा पुर येतो, तसे काही सहन करण्याची शक्यता ट्विटरवर कमी असते. पण मंडळी आता जग जोरदारपणे पुढे वाटचाल करत आहे.

सध्या तुमचा डेटा कंपनी गोळा करत असते. अश्यावेळी तुम्ही सोशल मीडियावर वावरत असताना काय सर्च करता, कुणाला मॅसेज करता या सगळ्यांची कंपनी नोंद ठेवत असते. पण मंडळी त्याच्याहुन घातक गोष्ट म्हणजे कधी कधी हॅकर्स घालत असलेला धुमाकूळ!! अनेक वेळा विविध देशांचे प्रोफेशनल हॅकर्स समोरच्या देशाची गुप्त माहिती चोरण्यासाठी हॅकिंग करत असतात. त्यातून बऱ्याचवेळा मौल्यवान माहिती त्यांच्या हातात पडत असते. तर कित्येक वेळा या हॅकर्सचा लोकांना प्रचंड त्रास होत असतो. कधी एखाद्या कंपनीची वेबसाईट हॅक करून तिचा गैरवापर करतात तर कधी एखाद्या मोठ्या सेलेब्रिटीचे अकाऊंट हॅक करून त्यांचे महत्वाचे मॅसेज, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामागे काही ब्लॅकमेलिंग सारख्या अस्त्राचा वापर करून पैसे कमवतात तर काही फक्त आसुरी आनंद घेण्यासाठी हॅकिंग करत असतात.

सध्या हा हॅकिंगचा ताजा बळी ठरलेले आहेत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन!! सोमवारी रात्री अमिताभ बच्चन यांचे अकाऊंट अचानक हॅक झाले. सुरवातीला यामागे कुणाचा हात आहे याचा पत्ता लागत नव्हता. पणन नंतर पाकिस्तान समर्थीत तुर्कीच्या टर्किश सायबर आर्मी ' अईलदीज टीमने' या सायबर हल्ल्याची जबाबदारी घेतली. मंडळी या हॅकर्सनी अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यावरून पाकिस्तान आणि तुर्कीच्या समर्थनार्थ मॅसेज पोस्ट केले होते. 

हॅकर्सनी अमिताभचा ट्विटरचा बायो पण बदलला राव!! वरून त्यांची प्रोफाइल फोटो पण बदलून तिथे अमिताभ ऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो ठेवला. एवढ्यावर ते थांबले नाहीत मंडळी, त्यांनी बायो बदलून लिहिले, "Love Pakistan"..

मंडळी अमिताभ म्हणजे काय साधा माणुस नाही हा गडी किती मोठा आहे ते सांगण्याची गरज पण नाही, ट्विटरवर नेहमी सक्रिय राहणारा हा महानायक असे अचानक काय बोलायला लागला म्हणून सगळ्यांना धक्काच बसला ना राव!! त्यांचे ट्विटरवर 3.74 कोटी फॉलोवर्स आहेत. त्यांनी सगळ्यांनी ती गोष्ट बघितली परत मीडिया आणि सोशल मीडियावर सुद्धा ही गोष्ट वायरल झाल्यावर अमिताभने तातडीने तज्ञ बोलवून त्याचे अकाउंट रिकव्हर करून घेतले. 

मंडळी, हॅकर्सनी अमिताभच्या अकाऊंटवरून एक ट्विट केले होते, त्याचे मराठी भाषांतर पुढीलप्रमाणे 'हा सगळ्या जगासाठी संदेश आहे, आम्ही तुर्कीच्या खेळाडूंप्रति आईसलँड रिपब्लिकने जे वागणूक दाखवली आहे तिचा निषेध करतो, आम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागतो, पण आमच्याकडे मोठी छडी आहे, आणि इथे एका सायबर हल्ल्याबद्दल बोलत आहोत, आईल्दीज सायबर आर्मी.'

हे प्रकरण असे कि तुर्कीची फुटबॉल टिम काही दिवसांपूर्वी युरो चषक 2020 खेळायला आईसलँड गेली होती. तिथे गेल्यावर एयरपोर्टवर त्यांची तपासणी करण्यात आली. 

अमिताभच्या ट्विटर हॅक प्रकरणाची चौकशी सायबर टीम आणि महाराष्ट्र सायबर टीम करत आहे. 

मंडळी आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास जास्ती जास्त शेयर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required