computer

दिल दोस्ती दुनियादारीचं दुसरं पर्व- दिल दोस्ती दोबारा.. १८ फेब्रुवारीपासून..

सासू-सुनांच्या आणि सगळ्या खोटेपणावर आधारलेल्या मालिकांतून "दिल दोस्ती दुनियादारी"नं मराठी मालिकांना बाहेर आणलं असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या गावांतून आणि वेगवेगळ्या कारणांमुळं एकत्र आलेल्या या सहा तरूण-तरूणींची कथा सगळ्यांनाच आवडली होती. त्यामुळंच जेव्हा ही मालिका बंद झाली तेव्हा लोक हळहळले आणि पुन्हा एकदा "खुलता कळी.." सारख्या मालिकांवाचून दुसरा पर्याय उरला नाही. 

मध्यंतरी याच लोकांनी ’अमर फोटो स्टुडिओ’ नावाचं एक भन्नात नाटक रंगभूमीवर आणलं आणि ते धमाल गाजतंय सुद्धा. तर आता ही मालिका १८फेब्रुवारीला त्यांच्या ’माजघरा’तून बाहेर येतेय. ऐकूनच मस्त वाटतंय ना? म्हणूनच  गेल्या पर्वातल्या मालिकेदरम्यानची  या कलाकारांच्या काही आठवणी.. 

बाकीच्या मराठी मलिकांमधलं मराठी एकदम ’हिंदा’ळलेलं होत असताना ’दिल दोस्ती...’नं मराठी भाषेचा दर्जा मस्त टिकवून ठेवला होता..

मंडळी, ’अमर फोटो स्टुडिओ’ पाहिलंत की नाही? आम्हाला तर ते एक एकदम कुरकुरीत आणि तरतरीत वाटलं. पाहा आमची एक मैत्रिण हे नाटक पाहिल्यावर काय म्हणते ते..

आधी या मालिकेवर ’फ्रेंडस’ या अमेरिकन मालिकेची कॉपी असल्याची टीका खूप झाली. आहेत, काही साम्यं आहेत, पण ही मालिका त्या कॉपीपलिकडेही बरंच काही आहे..

प्रेमात पडायला लावणारी ही आहेत मॅड मॅड माणसं..

मराठमोळ्या लोकांची मराठमोळी मालिका..

एक अमेय वाघ सोडला तर इतरांसाठी हा पहिलाच अनुभव होता. पण लवकरच यांचं नवखेपण गेलं आणि मालिका अशी रंगली की यंव..

हे पर्वही असंच हसतंखेळतं आणि धमालदार असो हीच इच्छा, हो की नाही? 

सबस्क्राईब करा

* indicates required