ती कोण रे ?

Subscribe to Bobhata

ती आधी फक्त पंधरा सेकंद दिसली. मग ती दिसावी म्हणून वाट बघत राहिलो आणि तासाभराने ती पुन्हा काही मोजके सेकंद दिसली. मग काही दिवस ती अशीच भेटत होती. ती तशी दिसायची काही क्षणच, पण प्रत्येक वेळी काळजाचा एक तुकडा पाडायाची. मग काही दिवसानी ती दिसेनाशी झाली . काही दिवस चुट्पुट लागली ती आजकाल दिसत नाही म्हणून. पण नंतर काही दिवसानी एक नविन ती दिसली. ही "ती" पण तशीच होती. हिचा ही लूक अगदी "हाय! मार डाला " होता. एकदम आयटम होती. ढासू होती. तुकडा होती. "तोबा तोबा " होती. पण काही दिवसांनी ही पण गेली. अशा अनेक पर्‍या आल्या आणि गेल्या. कधी जागेपणी दिसल्या तर कधी स्वप्नात येऊन त्रास त्रास करून गेल्या. बाय द वे, आम्ही बोलत आहोत तुम्हाला आवडलेल्या जाहिरातीतल्या मॉडेल्स बद्दल !!!. या दिसल्या, आवडल्या पण त्यांच्याबद्दल कधीच काही कळलं नाही. येत्या काही दिवसात बोभाटा या स्वप्नपर्‍यांशी तुमची ओळख करू देणार आहे. त्यापैकी आज परी नंबर एक "ओणिमा कश्यप ". देशातल्या कोणत्याही राज्यात तुम्ही राहात असला तरी कोकाकोलाच्या होर्डींगवर ओणिमा कश्यप दिसेलच. आता कोक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली मूळची "दिल्लीवाली लडकी " आणि आता मुंबईची पोरगी आहे. पहिली ऑडीशन : NDTV च्या रिऍलिटी शोसाठी पहिली जाहिरात : हिमालयाची कंप्लीट केअर टूथपेस्ट इतर : गोदरेजसाठी अनेक . जेव्हा मॉडेलींग करत नाही तेव्हा? चित्र काढते. भिंती चित्रांनी सजवते. मनातली खास बात : सामाजिक संदेश देणार्‍या चित्रपटात काम करायची इच्छा आहे . तो क्षण : "कोकसाठी शूट करताना फोटोग्राफरनी विचारलं, "दीपिका, रणबीर सलमानच्या बरोबरीने आता तुझी पोस्टर झळकतील तेव्हा काय वाटेल?". मला वाटलं तो माझी गम्मतच करतो आहे. पण काही दिवसानी संध्याकाळी घरी येत असताना मला माझं पहिलं होर्डींग दिसलं, अर्ध्या मैलावर दुसरं दिसलं , मग तिसरं ...." हा माझा "तो क्षण" !!!

सबस्क्राईब करा

* indicates required