computer

डोक्यावर केसांच्या ऐवजी सोनसाखळ्या?? कोणी आणि का केलाय या उद्योग??

भारतात सुवर्णप्रेमींची कमी नाही. अंगभर सोने घालून फिरणाऱ्या लोकांना गोल्डमॅन म्हटले जात असते. नुसतं गोल्डमॅन म्हटले तरी बरेच गोल्डमॅन तुमच्या नजरेसमोर तरळले असतील. पण ही सगळी मंडळी एका रॅपरपुढे पानी कम चाय वाटतील.

डॅन सूर नावाचा एक मेक्सिकन रॅपर आहे. या पठ्ठ्याने काय करावे? तर थेट याने डोक्यावर केसांच्या जागी चक्क ऑपरेशन करून सोन्याच्या चेन लावून घेतल्या आहेत. आता या चेन घेऊन तो फिरत असतो. २३ वर्ष वय असलेला हा रॅपर इतका विचित्र प्रयोग करून चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.

आजवर अनेक परदेशी सेलेब्रिटींना तुम्ही विविध प्रयोग करताना बघितले असेल. पण जो प्रयोग डॅन सूर नावाच्या या रॅपर बंधूंनी केला आहे, त्याची सर मात्र कुणालाच येणे शक्य नाही. डोक्यातून निघणाऱ्या या चेन्स त्याचा पूर्ण चेहरा झाकून टाकतात. जसे लोक केसांना मागे सारतात तसे तो सोन्याच्या चेन्स मागे सारताना तो आता दिसेल.

डॅनच्या मते केस रंगवणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. आपल्याला त्यापेक्षा वेगळे काहीतरी करायचे होते. अशात हा प्रयोग जगात कुणीही केलेला नाही म्हटल्यावर मी केला. भावाने याआधी दातात पण सोन्याचा वापर केला होता. त्याच्यामते आता या गोष्टीची मदत त्याला त्याच्या करियरमध्ये पण होईल.

त्याने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम आणि टिकटॉक अकाउंटवर शेअर केला आहे. हा फोटो वायरल व्हायला वेळ लागला नाही. लोकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता त्याला खरंच याचा फायदा होतो का हे तर भविष्यातच कळेल.

सबस्क्राईब करा

* indicates required