बापरे, सचिनने बायोपिकसाठी इतके पैसे घेतले !!!

सचिन तेंडूलकरच्या आयुष्यावर आधारित डॉक्यु-ड्रामा सिनेमा आपल्यातील अनेकजण अगदी पहिल्या दिवशी बघून आले असतील. सचिनच्या चाहत्यांनी तर हा सिनेमा डोक्यावर घेतलाय. सिनेमाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा सर्वांना एक प्रश्न पडला होता.  तो म्हणजे सचिनच्या आयुष्यावर सिनेमा, मग यात सचिनची भूमिका कोण करणार ब्वा ? पण कसं हाय मित्रा, देवाची भूमिका साक्षात देवच करू शकतो. नाही का ?

या सिनेमात खुद्द सचिन सूत्रधाराच्या भूमिकेत दिसलाय. आता स्वतःवर आधारित सिनेमा आणि त्यातही स्वतः भूमिका करणार म्हटल्यावर मानधन काय घेणार...नाही का ? पण सचिनने या सिनेमासाठी चक्क एखाद्या फिल्मस्टारला शोभेल एवढ्या आकड्याचं मानधन उचललंय राव.

काही खबरींच्या मते सचिनने ४० करोड रुपये मानधन घेतलंय तर निर्मिती संस्थेच्या म्हणण्यानुसार सचिननं अगदी ४० करोड न घेता ३५ ते ३८ करोड इतकं मानधन आकारलंय. सिनेमा ज्या स्पीडमध्ये बॉक्स ऑफिसवर पळतोय त्यावरून दिसतंय की सचिनचं मानधन तर बघता बघता वसूल होईल.

मायला आता आम्ही त्या माणसांना शोधतोय जे म्हणत होते कि सचिनने एक रुपयाही न घेता सिनेमात काम केलंय. कुठे हायत ते लोक?

सबस्क्राईब करा

* indicates required