चक्क बर्फापासून वाद्यं ? आणि ती वाजतात तरी कशी ? त्यांचे सूर ऐकाच राव तुम्ही !!

Subscribe to Bobhata

आईस-हॉटेल म्हणजेच बर्फाचं हॉटेल,  हा प्रकार तर आता जुना झाला आहे. मुंबईत जरी बर्फ पडत नसला, तरी मुंबईतही आईस हॉटेल तयार करण्यात आलंय. बर्फाचं हॉटेल, बर्फाचं शिल्प वगैरे आपण अनेकदा बातम्यांमध्ये बघतो. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बर्फाने तयार करण्यात आलेली संगीत वाद्यं.

स्वीडनच्या ‘टीम लिन्हार्ट’ या मूर्तीकाराने आपली अनोखी शक्कल लढवून चक्क बर्फाच्या सहाय्याने संगीत वाद्यं निर्माण केली आहेत. त्याने याला ‘आईस-म्युझिक’ असं नाव दिलंय. वाद्यांचा मुख्य भाग त्याने बर्फाने तयार केला आहे आणि बाकीच्या गोष्टी अस्सल वाद्यांसारख्याच आहेत. फोटोमध्ये तुम्ही हे पाहू शकता. 

स्रोत

मंडळी, वाद्याचा मुख्य भाग हा बर्फाने तयार केला असल्याने वाद्यातून निघणारं संगीत हे वेगळ्याच प्रकारचं आहे. लिन्हार्टने म्हटलंय की त्याने जेव्हा पहिल्यांदा अशा प्रकारचं वाद्य वाजवलं तेव्हा तो प्रचंड उत्साहित झाला. तो क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय होता. 

त्याने यानंतर अश्या वाद्यांचा चक्क एक ऑर्केस्ट्रा तयार केलाय. याला तो ‘फ्रोझन ऑर्केस्ट्रा’ म्हणतो. या ऑर्केस्ट्रामध्ये गिटार, व्हायोलीन, मरीम्बा यासारखी महत्वाची वाद्यं सामील आहेत. आता तुम्हाला वाटेल की बर्फाने बनलेली वाद्यं कितीवेळ टिकणार ? हा खरं तर जास्त अवघड भाग असतो.

स्रोत

ही वाद्य अर्थातच अशा जागी वाजवता येतील, जिथे गोठवणारं वातावरण असेल. वातावरण थंड  असलं तरी काळजी ही घ्यावीच लागते. वाद्य विरघळू नये म्हणून त्या वाद्यांमधून एका विशिष्ट प्रकारचा प्रकाश परावर्तीत केला जातो, ज्यामुळे वाद्य विरघळत नाही. या व्यतिरिक्त शरीराच्या उष्णतेने वाद्य विरघळून वाद्यातून निघणाऱ्या संगीतावर त्याचा परिणाम होऊ नये याचीही काळजी घेतली जाते.

स्रोत

मंडळी, ही वाद्यं हाताळायला कठीण असली तरी यातून निघणारं संगीत म्हणजे लाजवाब असतं. तुम्हीच बघा राव.

सबस्क्राईब करा

* indicates required