आता येणार 'माहेरची साडी २'...खबर ऐकून लोकांमध्ये खळबळ !!!

माहेरच्या साडीने महाराष्ट्रातील आया-बायांना रडवल्यानंतर आता एक उडतीउडती खबर आली आहे की ‘माहेरची साडी पार्ट २’ येणार आहे ब्वा! दिग्दर्शक ‘विजय कोंडके’ ज्यांनी माहेरची साडी बनवला होता, तेच या चित्रपटाच्या सिक्वलवर काम करत आहेत. त्यांच्या मते पिढी बदलली तरी कुटुंब व्यवस्था तीच असल्याने आजच्या पिढीलाही हा चित्रपट आवडेल. बघा केवढा हा कॉन्फीडन्स!!

सोशिक सून, सुनेचा भाऊराया (एक हात तुटलेला ठाकूर), मुलीचं तोंडही न बघणारा खडूस बाप, कजाग सासू हे असलं टिपिकल कॉम्बिनेशन आजच्या घडीला चालेल का राव? ते सोडा.. पण आज जिथे मराठी सिनेमा त्याच्या वेगळ्या विषयांमुळे नावाजला जातोय तिथे ८०-९० च्या दशकातला मसाला माणसांना कितपत आवडेल? प्रश्न अनेक आहेत.

ही बातमी आल्यानंतर अनेकजण कोमात गेलेत मंडळी. आम्ही त्यांच्या दुःखात सामील आहोत. असो...!

...पण आम्ही काय म्हणतो. माहेरची साडीपेक्षा ‘माहेरचा लेहंगा’, ‘माहेरचा स्कर्ट’, ‘माहेरची जीन्स’ किंवा त्यातही नवीन म्हणजे ‘माहेरचा सेल्फी’ असा काही प्रयोग करून बघितला तर? कदाचित लोकांना आवडेलही. आपलं जाता जाता एक सजेशन, बाकी काय नाय...

सबस्क्राईब करा

* indicates required