computer

चक्क माकडाने मास्क घातला आहे... हा व्हायरल फोटो पाहा!!

कोरोना सध्या भारतात आवरला गेला असला तरी कधी तिसरी लाट येईल सांगता येत नाही. या क्षेत्रातील तज्ञ रोजच्या रोज वेगवेगळे भाकीत व्यक्त करत आहेत. कोरोना विरुद्ध लढ्यातील सर्वसामान्य जनतेचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मास्क आहे. 

मास्कचा वापर करूनच आपण कोरोनाला दूर ठेऊ शकतो. जसा मास्कचा वापर कमी झाला तसे सर्वबाजूने मास्क वापरा म्हणून सूचना सुरू होतात त्यामागे हेच कारण आहे की मास्कमुळे आपण कोरोनाला दूर ठेऊ शकतो.
 

बास्केटबॉल खेळाडू असलेला रेक्स चॅम्पियन याने ट्विटर एका माकडाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे तो बघितला तर प्राण्यांमध्ये सुद्धा किती जागृती झाली आहे याचा अंदाज येऊ शकतो. रस्त्यावर भटकणारे एक माकड अचानक मास्क बघून थांबतो.

रस्त्याच्या कडेला कुणीतरी फेकलेले हे मास्क बघून तो चक्क ते मास्क स्वतः घालून घेतो. पण आता त्याची पंचाइत अशी होते की ते मास्क डोळ्यांपर्यंत आल्याने त्याला काय करावे हे कळत नाही याच कन्फ्युजनमध्ये तो असताना व्हिडीओ संपतो. 

हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. कोरोनाने जगाला एवढे गुंतवून ठेवले आहे की प्राण्यांना पण मास्क घालून फिरायचे असते हे कळत आहे. दुसरीकडे अजूनही लोकांना मास्कचे महत्व कळत नाही किंवा कळूनही वळत नाही हे म्हणावे लागेल. जरा कोरोनाचे आकडे कमी झाले की मास्कविना हिंडणारे चेहरे आपल्याला दिसायला लागतात. जे माकडाला कळले ते माणसांना कधी कळेल हेच या निमित्ताने समोर येते.

सबस्क्राईब करा

* indicates required