computer

दिनविशेष: अभिनेत्री नर्गिसच्या पुण्यतिथीनिमित्त पाहूयात त्यांच्या चित्रपटातील पाच अजरामर गाणी

आज ३ मे. नर्गिसची पुण्यतिथी. मूळच्या फातिमा अब्दुल रशीद या मुलीने बेबी नर्गिस या नावाने १९३५साली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.  या तारकेने एकापेक्षा एक सरस असे अनेक चित्रपट आपल्याला दिले. काही अपवाद वगळता सगळे सुपर हिट चित्रपट राज कपूर सोबत होते. १९५७ साली मदर इंडीया या चित्रपटासाठी नर्गिसला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता.  आज बघू या नर्गिसची  पाच अजरामर गाणी.

५. चोरी चोरी

’रोमन हॉलिडे’वरून घेतलेला हा चित्रपट अतिशय सुंदर होता. घरातून पळून गेलेल्या श्रीमंत मुलीची भूमिका नर्गिसने यात केली होती

४. श्री ४२०

या सिनेमाची कथा आणि संगीत या दोन्ही बाजू अत्यंत मजबूत होत्या. लांडीलबाडीकरून जमवलेल्या”माये’पासून नायकाला परावृत्त करणार्‍या ’विद्या’ची भूमिका नर्गिसने यात साकारली होती.

३. आवारा

’आवारा’  विशेषत: ’आवारा हूं’ हे गीत  हा भारताव्यतिरिक्त सोव्हियत रशिया, चीन  तुर्की, अफगाणिस्तान, रोमानिया या देशांतही खूपच गाजले. ’घर आया मेरा परदेसी’ हे भारतातीय सिनेमातील पहिले स्वप्नदृश्य. 

२. बरसात

राज कपूर दिग्दर्शित आणि निर्मित ’बरसात’ हा राज कपूरचा पहिला सुपरहिट सिनेमा. या चित्रपटाच्या यशातूनच ’आर. के’बॅनरची निर्मिती झाली. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आणि आर. के. च्या लोगोमध्ये बरेच साम्य दिसते.

१. मदर इंडीया

भारतीय सिनेमाचा इतिहास ज्या चित्रपटांशिवाय अपूर्ण असेल, त्या सिनेमांच्या यादीत ’मदर इंडिया’ला खूप वरचं स्थान आहे. शेतकरी आणि सावकारी पाश यांवर आधारित हा सिनेमा सामाजिक मूल्यांवर आधारित होता. 

सबस्क्राईब करा

* indicates required