राडा करणारा 'डेडपूल' येतोय राव...हिंदी ट्रेलर पाह्यलात का !!

शक्तिमान, सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन, फ्लॅश इत्यादी वगैरे आपन लय सुपरहिरो बघितले पन ‘डेडपूल’ सारखा सुपरहिरो नाय बघितला राव. आता त्याला डेडपूल म्हनन्यापेक्षा डेडभाऊ., डेडदादा, राडा करणारा डेडपूल म्हटलं तरी चालेल. तो हायच तसा एकदम ‘कूल’. मंडली, काय हाय ना, डेड भाऊचा दुसरा पिच्चर येतोय. त्याचा टेलर (trailer) आलाय. त्याच्याबद्दलच सांगायला आलोया.

तुम्ही त्याचा आधीचा पिच्चर बघितला का? नाय? आरं लेका काय केलं हे !! चला जाऊद्या. ‘डेडपूल २’ चा ट्रेलर बघून तुम्हाला आधीचा पिच्चर बघावासा नक्की वाटेल ही आपली गॅरेन्टी. 

डेडपूल कोन हाय ?

स्रोत

हां, आता आपल्यातल्या काही लोक्सना डेडभाऊबद्दल माहित असेल आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी डेडभाऊचा हा शॉर्ट इंट्रो. 

‘एक्समॅन सिरीज’ मधला ‘एक्समॅन ऑरिजिंस: वूल्वरिन’ हा पिच्चर तुमी बघितला असंल तर त्यात डेडभाऊ पयल्यांदा दिसला होता. त्यात एक खतरनाक, हत्यार चालवणारा, भाड्याचा सैनिक म्हणून डेडभाऊ दिसला होता. म्हणजे हिरो बनन्याच्या आधी डेडभाऊ विलन होते.

डेडभौचं नाव होतं ‘वेड विल्सन’. फिल्म मधी एक तोंड शिवल्याला मानूस वूल्वरीन तात्याबरोबर फायटिंग करताना दिसतो ना तोच डेड. याच पात्राला की नै ह्या लोकांनी वाढवलं अन त्याचा झाला ‘डेडपूल’.  अशी आहे आपल्या डेडभौच्या जन्माची कथा.
 

टेलरविषयी दोन शब्द

स्रोत

मंडली, टेलरमधी नुसता जाळ अन् धूर संगटच हाय. डेडतात्याची फायटिंग, हिरोगिरी, रोमान्स, विलन, हसून हसून बेजार करनारे डायलोग्स. सगळं हाय यात. 

भाऊ, हॉलीवूडचे पिच्चर हिंदीमध्ये दाखवताना लय म्हणजे लय माती खाल्ली जाते. त्याचं काय हाय ना, डायलोग्स हिंदीमध्ये नीट ट्रान्सलेट नाय करत हे लोक. पन डेडभौच्या पिच्चरसाठी त्यांनी चांगला लेखक निवडलेला दिसतोय. स्वच्छ भारत अभियान काय, विकास काय, दंगल, सुलतान अन बाहुबली काय! विषयच नाही ना भौ!!  डेडभौला एकदम देसी केलंय या लोकांनी.

१८ मे ला डेडभाऊ आपल्याला भेटीला येणार हायत पन त्या आधी टेलर बघून घ्या ना राव !!