आजच्या मुहूर्तावर आलाय रजनी आण्णाच्या रोबोटचा ट्रेलर....व्हिलन कोण आहे माहित आहे का??

Subscribe to Bobhata

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चक्क रोबॉट २.० चा टीझर रिलीज झालाय भाऊ. अक्षय भाऊने ट्विटरवर आज सकाळीच माहिती दिली. एवढे दिवस ढकलाढकली झाल्यानंतर शेवटी २९ नोव्हेंबर २०१८ ला सिनेमा रिलीज होतोय.

आता थोडं ट्रेलर विषयी बोलूया...

चित्रपटात एक हिरो आहे, एक व्हिलन आहे आणि समस्या आहे. हिरो आहे अर्थातच चित्ती आणि व्हिलन आहे अक्षय कुमार. अक्षय कुमारच्या पात्राचं नाव आहे डॉक्टर रिचर्ड उर्फ क्रो मॅॅन. सोप्प्या भाषेत आपण त्याला मोबाईल चोर म्हणूया. तर, हा मोबाईल चोर सगळे मोबाईल चोरतो आणि त्यांना पाखरासारखं उडवतो. (म्हणूनच त्याला 'क्रो मॅॅन' म्हणत असावेत.) मोबाईल हवेत उडताना बघून माणसं घाबरतात आणि मग काय रजनी अण्णा सांगतो की यासाठी सुपरपॉवरची गरज आहे. आता सुपरपॉवर म्हणजे कोण ? अर्थात “चित्ती”. दुसरा पर्यायच नाही ना भाऊ. मागच्या भागाच्या शेवटी त्याला तुकड्या तुकड्यांनी शोभेसाठी ठेवून दिलं होतं. या भागात तो अखंड पळताना दाखवलाय राव.

स्रोत

गेल्या भागात काय होतं, चित्ती स्वतःचं हिरो होता आणि व्हिलन सुद्धा, पण या दुसऱ्या पार्ट मध्ये एक नवीन व्हिलन आणून चित्तीला हिरो करण्यात आलंय. हिरो-व्हिलन कोणीही असो सुपरस्टार एकमेव आहे –“रजनी अण्णा”.

तुम्ही जर अक्षयचे फॅन असाल तर टीझर तुमची निराशा करू शकतो. इथे ‘सबकुछ रजनी’ असल्याने टीझर मध्ये अक्षय कुमार (मोबाईल चोर) ची अगदी लहानशी झलक बघायला मिळते. आपण तेवढ्यावरच समाधान मानावं. 

एक तर सांगायचं राहूनच गेलं - टीझर बघून संपूर्ण चित्रपट पाह्यल्याचा आनंद होतो राव. तुम्हाला सुद्धा हेच जाणवलं का ? सांगा बरं !!

सबस्क्राईब करा

* indicates required