computer

तो ओमीक्रॉनचा सिनेमा नक्की कधी आला होता ? काय होती त्याची कथा ?

ओमीक्रोन हे नाव वाचल्याबरोबर सर्वानाच धस्स व्हायला होत आहे. कोरोनाचा नविन व्हेरियंट सध्या ओमीक्रोन या नावाने ओळखला जात आहे. या ओमीक्रोन किती आणि कसा प्रभावी आहे यावर अजूनही तज्ञांचे मतभेद असल्याने त्यावर आताच भाष्य करणे हे काय योग्य होणार नाही. पण हे ओमीक्रोन हे नाव काय पहिल्यांदा समोर आले अशातला भाग नाही.त्यात आणखी एका वादाची भर म्हणजे याला ओमीक्रॉन म्हणायचे ओमायक्रॉन ! आम्ही आपलं साधं सरळ ओमीक्रॉन म्हणतोय झालं !

तर सांगायची गोष्ट अशी की ओमीक्रोन नावाचे दोन सिनेमे येऊन गेले आहेत.या सिनेमांची आता चांगलीच चर्चा रंगत आहे.महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आणि रामगोपाल वर्मा यांसारख्या मोठ्या लोकांनी या सिनेमाबद्दल ट्विट केले आहे. त्यात काही महाभागांनी ओमीक्रोन सिनेमाचे पोस्टर फोटोशॉप करून ओमीक्रोन व्हेरियन्ट करून टाकले. रामगोपाल वर्मा याच भूलथापाला बळी पडून ट्विट करून गेला. १९६३ साली म्हणजेच तब्बल ६० वर्षांपूर्वीच हा 'ओमीक्रोन' नावाचा सिनेमा येऊन गेला आहे. 

६० वर्ष जुना सिनेमा म्हटला म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल तो म्हणजे यात कोरोनाबद्दल काही दाखवले आहे का? तर उत्तर नाही असे आहे. मुळात हा सिनेमा एक एलियन पृथ्वीवर येऊन इथल्या एका माणसाचे शरीर धारण करून पृथ्वी कब्जात घेण्याचा प्रयत्न करतो यावर आधारित आहे. हा सिनेमा यु ट्यूबवर आहे. म्हणजेच या सिनेमात काय कोरोनाचा काहीही संबंध येत नाही. 

२०१३ साली आलेला द व्हिजिटर फ्रॉम प्लॅनेट ओमीक्रोन नाव असलेला सिनेमा मात्र थोडा मिळताजुळता म्हणता येईल. यात एक अलियन जैविक विषाणू घेऊन पृथ्वीवर येतो आणि संपूर्ण पृथ्वी वेठीस धरतो. कोरोनाने पण अशीच पृथ्वी वेठीस धरली असली तरी यामागे एलियन्स आहेत का हे मात्र आपल्याला माहीत नाही.या सिनेमात एक शूर बाई या एलियनला हरवते अशी स्टोरी आहे. 

तर असे दोन सिनेमे ओमीक्रोन नाव घेऊन येऊन गेल्याने लोकांना या सिनेमांचा आणि कोरोना व्हेरियंटचा काही संबंध आहे का असा प्रश्न पडला होता. तर त्यांना उत्तर आता मिळाले असेल. मुळात ओमीक्रोन हे नाव ग्रीक अल्फाबेटचे आहे. जसे डेल्टा अल्फाबेटचे नाव होते तसेच हे ओमीक्रोन आहे. डेल्टा जसे इतर ठिकाणी वापरले जाते तसेच ओमीक्रोनही वापरता येऊ शकते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required