computer

या जुन्या चित्रात तुम्हांला अस्वल सापडतं का पाहा!! बऱ्याचजणांना हे जमलं नाहीय बरं..

एखाद्या पेंटिंगमध्ये अनेक रहस्यं असू शकतात. असं म्हटलं रे म्हटलं की लोकांच्या डोक्यात मोनालीसा तरळून जाते. पण पेंटिंगमध्ये जे दिसते त्याव्यतिरिक्तही बरंच काही असू शकते. मात्र यासाठी तो कलाकारही तितक्याच ताकदीचा असायला हवा. पेंटिंगमध्ये दृष्टीभ्रमही लपलेले असू शकतात. आज असेच एका पेंटिंगधील ऑप्टिकल इल्युजन सोडवून पाहू.

फोटोत दिसणारे हे पेंटिंग बराच वेळ डोके खाजवायला लावू शकते. तल्लख बुद्धी असेल तर हे काम लवकरही होईल म्हणा. या निमित्ताने तुमच्या निरीक्षणशक्तीचाही अंदाज घेता येईल. या पेंटिंगमध्ये असलेले एक अस्वल फक्त शोधायचे आहे. शोधा म्हणजे सापडेल या म्हणीप्रमाणे इथे काम करावे लागेल.

या पेंटिंगमध्ये एक शिकारी दिसत आहे. हातात बंदूक घेऊन तो गुडघ्यावर बसला आहे. तो ज्या पद्धतीने दबा धरून बसला आहे, त्यावरून तो शिकार शोधत आहे हे कळून येईल. तर त्याच्या आजूबाजूला बर्फाळ जंगल दिसत आहे. हे पेंटिंग प्लेबझकडून शेयर करण्यात आलं आहे.

कितीही निरीक्षण केले तरी हे अस्वल कही हाती लागत नाही अशी अवस्था अनेकांची झाली असेल. पण जवळून बघितले तर लक्षात येईल की मागच्या बाजूला हे अस्वल आहे. या पेंटिंगमधील हा अस्वल एकतर बेशुद्ध असेल किंवा झोपले असेल. कारण ते जमिनीवर पडून आकाशाकडे तोंड करून पडलेल्या अवस्थेत दिसत आहे.

मग, कुणाकुणाला हे अस्वल सापडले होते? कमेंटबॉक्समध्ये कळवा!!

सबस्क्राईब करा

* indicates required