या दुर्मिळ फोटो मधल्या किती लोकांना तुम्ही ओळखू शकता? सांगा बरं !!!

राज कपूर, दिलीप कुमार, धर्मेंद्र त्याच बरोबर शर्मिला टॅगोर, सायरा बानो हे एकत्र एकाच फ्रेम मध्ये दिसणं म्हणजे दुर्मिळातही दुर्मिळ गोष्ट पण ही किमया या एका फोटोने साधली आहे. हा फोटो बघा राव चित्रपट सृष्टी गाजवणारे ६० आणि ७० च्या दशकातले एकशे एक असे कित्त्येक चेहरे दिसत आहेत.

मनोज कुमार, राज कपूर तर चक्क भारतीय बैठकीत दिसत आहेत. दिलीप कुमार गुढग्यावर बसलेत आणि लता दीदी, आशा ताई सुद्धा दिसत आहेत. या सर्व तारे-तारकात मध्यभागी आहेत इंदिरा गांधी. राजकारण आणि कलाक्षेत्र एकत्र एका फ्रेम मध्ये दिसण्याची ही दुर्मिळ वेळ आहे.

स्रोत

राज बब्बर यांनी २०१५ साली हा फोटो फेसबुकवर अपलोड केला होता त्यानंतर २ वर्षांनी हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या फोटोची तारीख अजून कळू शकलेली नाही पण फोटोत दिसणारे चेहरे पाहता तारखे बद्दल आपण अंदाज लावू शकतो.

तर मंडळी यात आणखी बरेच चेहरा दिसत आहेत बरं का...तुम्हाला कोण कोण दिसलं ?

सबस्क्राईब करा

* indicates required