सलमान खानच्या ट्रोलर्सनी त्याला त्रास देण्यासाठी वापरलेला मार्ग पाहून त्याला थेट कोर्टाची पायरी चढावी लागली!!!

सेलेब्रिटींना सोशल मीडियावर ट्रोल करणे आता "न्यू नॉर्मल" झाले आहे. अनेकवेळा असे करणे चुकीचे असते आणि अनेक सेलेब्रिटींना याचा मोठा त्रास होत असतो. ट्रोल करण्यापर्यंत ठीक होते. सलमान खानला असाच ट्रोलिंगचा सामना वेळोवेळी करावा लागत असतो. अर्थात त्यासाठी तो स्वत:च कारणीभूत आहे हे ही आहेच. तर इंटरनेटवर त्याला ट्रोलिंगसाठी दिलेले नाव म्हणजे सेलमॉन बॉइ. पण पुण्यातल्या पठ्ठ्यांनी या नावाने थेट एक गेम बनवून टाकला.

हे ऍप इतके खतरनाक आहे की त्याविरुद्ध खुद्द सलमान खानला केस करावी लागली. पुण्यातील पॅरडी स्टुडिओ नावाच्या कंपनीने हा गेम बनवला आहे. या गेमचे मुख्य पात्र सलमान खानसारखे आहे आणि सलमानच्या आयुष्यातल्या हिट अँड रनसारख्या प्रकरणावर हा गेम आहे. सलमान खानला राग का आला हे तुम्हाला आता समजले असेल.

गेममध्ये तीन लेव्हलस आहेत. यात सुरुवातीला सेलमोन बॉइ ऍश नावाची दारू पिताना दिसतो. पहिल्या लेव्हलला तो पार्कमध्ये हरीण आणि माणसांसारख्या दिसणाऱ्या एलियन्सवर गाडी चढवतो. तर दुसऱ्या लेव्हलला तो एका बर्फाळ भागात पोलर बियरसारख्या कॅरेक्टरला मारतो. तिसऱ्या स्टेजला वाळवंटात तो उंटांना मारतो.

हे सगळे वाचून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल ती म्हणजे ऐश्वर्या राय, हिट अँड रन, काळवीट शिकार प्रकरण या सर्व गोष्टी या गेममध्ये आहेत. ज्या सलमान खानच्या आयुष्यातील प्रचंड वादग्रस्त गोष्टी आहेत. हा गेम कमी वेळेत प्रचंड हिट झाला. त्याला १० हजार डाउनलोड आणि ४.७ स्टार्सची रेटिंग पण मिळाली.

सलमान खानने लागलीच यावर कायदेशीर भूमिका घेत न्यायालयाचे दरवाजे या गेमविरुद्ध ठोठावले. न्यायालयाने पण त्याची मागणी मान्य करत या गेम गुगल प्ले स्टोरवरून हटविण्यास सांगितला आहे. पण आजच्या इंटरनेटच्या जगात लोक काय डोक्यालिटी लढवतील याचा नेम नाही हेच पुन्हा एकदा समोर येते.

सबस्क्राईब करा

* indicates required