computer

शार्क टॅंक इंडियाचा दुसरा सीझन येतोय. कसं सहभागी व्हायचं ते ही पाहा!!

शार्क टॅंक अमेरिकेची क्रेझ भारतातही पोचली आणि शार्क टॅंक इंडिया या शोने अनेक लोकांना टीव्हीसमोर ओढले. कोरोनानंतर नोकऱ्यांची असलेली असुरक्षितता आणि जगसहित देशभर वाढत असलेले स्टार्टअप कल्चर यामुळे देशभरातील यशस्वी स्टार्टअप संस्थापकांच्या देखरेखीखाली सुरू झालेला हा शो तुफान चालला.

एकतर या शोमध्ये अनेक स्टार्टअप्स इन्व्हेस्टमेंटच्या ऑफर्स घेऊन येत असल्याने लोकांना अनेक स्टार्टअपची ओळख झाली. या कंपन्या वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित बिझनेस मॉडेल कसे तयार करतात, एकंदरीत कागदावरची योजना ते प्रत्यक्षात हातात सांगण्यासारखा नफा येईपर्यंत कसे काम करतात हे सर्व यातून लोकांना कळाले. तसेच या स्टार्टअप्सचे शार्कनी केलेल्या विश्लेषणामुळे भविष्याच्या दृष्टीने लोकांच्या अभ्यासात भर पडत होती म्हणून सर्व बाजूने हा शो लोकांसाठी महत्वाचा होता.

आता याच शो ची नवी आवृत्ती येऊ घातली आहे. शार्क टॅंक इंडियाचा सीझन-2 येत आहे अशी घोषणा सोनी टेलिव्हिजन कडून झाली आहे. तसा प्रोमोही त्यांनी पोस्ट केला आहे. हा प्रोमो बघून लोकांच्या उत्सुकतेत भर पडणार आहे.

प्रोमोची सुरुवात एका आशावादी कर्मचाऱ्यासोबत होते. तो बॉसला स्वतःच्या बिजनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मस्का मारत असतो. पण हा टिपिकल बॉस त्याला इग्नोर करतो. अशातच त्याला व्हॉइस ओव्हर ऐकू येतो, "इन्व्हेस्टमेंटसाठी चुकीच्या दरवाज्यांवर थाप देणे बंद करा, पहिल्या सीझनच्या यशानंतर शार्क टॅंक इंडियाचा नवा सीझन येत आहे."

पुढे या प्रोमोमध्ये दिसते की कसे यात आजवर ८५००० अर्ज आले, ४२ कोटींचे इन्व्हेस्टमेंट झाले. अश्नीर ग्रोव्हर, नमिता थापर, पियुष बन्सल, अनुपम मित्तल, अमन गुप्ता, विनिता सिंग, घजल अलग यांनी विविध स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून त्यांना फायद्यात आणले आहे. आता नव्याने या शोमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन देखील सुरू झाले आहे.

या शोवर अनेक असे स्टार्टअप आले जे कदाचित पुढे जाऊन देशभर नावाजतील, काहीतर फक्त टाईमपास साठी आले असेही म्हणता येईल. काही असले तरी मोठया उमेदीने काहीतरी नवा उद्योग करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा शो मोठी संधी आहे.

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता.

https://sharktank.sonyliv.com/

सबस्क्राईब करा

* indicates required