दिल दोस्ती दुनियादारीच्या सुजय आणि रेश्माचं झालंय लग्न.....फोटो पाहून घ्या भाऊ !!

राव, सुव्रत जोशी म्हणजे दिल दोस्ती दुनियादारीचा सुजय आणि सखी गोखले म्हणजे लाजरीबुजरी रेश्मा यांचं फार दिवसापासून झांगाट चाललं होतं. पण काल परवापर्यंत दोघेही म्हणत होते की अस्सं काहीच नाहीये. पण अखेर आज ११ एप्रिल रोजी त्यांच्या नाटकावर पडदा पडलाय राव. कारण त्यांनी डायरेक्ट लग्नच उरकलंय.
आता किती पण गुप्तता पाळली तरी सोशल मिडीयावर सेलिब्रिटी लग्न लपून राहतंय व्हय. हे पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो.
अमेय वाघ, पर्ण पेठे, निपुण धर्माधिकारी, सुनील बर्वे, पूजा ठोंबरे, अशा दोघांच्याही जवळच्या लोकांच्या साक्षीने हा खाजगी विवाह सोहळा पार पडला.
काही दिवसापूर्वीच दोघांनी मेहंदीचे फोटो शेअर केले होते. शिवाय एका फोटो मध्ये सुव्रतच्या फोटोवर ‘नवरा’ आणि सखीच्या फोटोवर ‘नवरी’ लिहिलं होतं. यावरून लोकांनी बरोबर ओळखलं की येत्या काही दिवसातच लग्न होणार आहे.
हे दोघे सध्या काय करतात ?
मंडळी, दिल दोस्ती दुनियादारी नंतर दोघेही दिल दोस्ती दोबारा मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांनी मिळून अमर फोटो स्टुडीओ मध्ये काम केलं. सुव्रतने मध्ये काही मोजक्या फिल्म्स पण केल्या आहेत. शिकारी हा त्यातल्या चावट कंटेंटमुळे तुफान चर्चेत होता. सखी मात्र नाटक केल्यानंतर लंडनला शिक्षणासाठी गेली. सुट्ट्यांमध्ये तिने हा लग्नाचा बेत आखला होता.
तर मंडळी, दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटते ?? आम्हाला नक्की सांगा !!