मराठी सेलिब्रिटी करताहेत 'फ'च्या बाराखडीचे व्हिडीओ.. कारण टॉक् करत येतोय फास्टर फेणे आता मोठ्या पडद्यावर..
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपला लाडका फाफे म्हणजेच फास्टर फेणे हा आता मोठ्या पडद्यावर येतोय. फुरसुंगीच्या फास्टर फेणेची भूमिका करतोय आपलाच लाडका वाघांचा अमेय!! यापूर्वी छोट्या पडद्यावर हीच भूमिका सुमीत राघवननं केली होती. तीही चक्क १९८८साली!! लाल चौकड्यांचा शर्ट घातलेला, टॉक करत मित्रांना आवाज देणारा हा हडकुळा सुपरहिरो बनेश फेणे अजूनही तितकीच भुरळ घालतोय. आपल्या लहनखुऱ्या सुपरहिरोला मोठ्या तरूणाच्या रूपात पाहताना काय वाटेल हे मात्र आताच सांगता यायचं नाही..
हा सिनेमा २७ ऑक्टोबरला रिलीज होणार होतोतय अशी माहिती या चित्रपटाचे प्रोड्युसर यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यानं केलं आहे. या सिनेमाच्या स्वागतासाठी मराठी सेलिब्रेटी फुल्ल जोमानं सोशल मीडियावर आले आहेत आणि चक्क एका पाठोपाठ एक 'फ'च्या बाराखडीचे व्हडिओ टाकत आहेत.
बघा, यातल्या कोणाकोणाला तुम्ही ओळखता??




