वैद्यकीय क्रांती - शास्त्रज्ञांनी तयार केलं कृत्रिम हृदय !!!

Subscribe to Bobhata

हृदयाचे विकार आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे. पण आता शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत. अॅडव्हांस 3D प्रिंटींग तंत्रज्ञानाने चक्क कृत्रिम हृदय तयार केलं गेलं आहे मंडळी...

ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्यावेळी देणगीदार मिळत नसल्यामुळे अनेकांचा जीव जातो. दुसरं हृदय मिळेपर्यंत डॉक्टर ब्लड पंप्सच्या मदतीने रुग्णाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण कृत्रिम हृदयामुळे रुग्णाला संपूर्णपणे नवे हृदय मिळते.

3D प्रिंटींग तंत्रज्ञानातून सिलिकॉनचं हृदय बनवण्यात आलं आहे. सिलिकॉनचा वापर असल्याने हुबेहूब मानवी शरीरातल्या स्नायूंप्रमाणे याची बनावट आहे. तसेच याचं वजन केवळ ३९० ग्रॅम असणार आहे. महत्वाचं म्हणजे मानवी हृदय जसं काम करतं, तसंच हे कृत्रिम हृदय देखील काम करतं. नुकतचं स्वित्झर्लंड मधल्या "ETH ज्युरिक" या रिसर्च सेंटरमध्ये  याची चाचणी पार पडली आहे.

सध्या हे हृदय ३००० वेळा पप्मिंग करण्याच्या क्षमतेचं आहे.  याचा अर्थ ४५ मिनिटापर्यंत हे कृत्रिम हृदय काम करू शकतं.  पण शास्त्रज्ञांच्या मते ही फक्त एक पायरी आहे.  पुढे यात आणखी प्रगती करण्यात येईल.

हृदय विकार म्हणजे भविष्यात तेवढा मोठा प्रश्न राहणार नाही असचं या संशोधनातून दिसतंय !!

सबस्क्राईब करा

* indicates required