'Bye Bye Polio' : पहा जागतिक पोलिओ दिनाच्या निमित्ताने साकारलेलं एक अप्रतिम शिल्प !!

काल जागतिक पोलिओ दिन होता. जोनस सॉल्क या शास्त्रज्ञाच्या जन्मदिवसानिमित्त २४ ऑक्टोबर हा दिवस पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. जगातून पोलिओच्या हकालपट्टीत जोनस सॉल्क यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली होती.

मंडळी या दिवसाकडे आपण पोलिओशी दिलेल्या यशस्वी लढ्याचं प्रतिक म्हणून बघू शकतो. म्हणूनच आजचा दिवस साजरा करण्यासाठी प्रसिद्ध ‘सँड आर्ट’ कलाकार ‘सुदर्शन पटनायक’ यांनी ओडिसाच्या किनाऱ्यावर एक अप्रतिम शिल्प साकारलं आहे. समुद्र किनाऱ्यावरची वाळू आणि आपलं कौशल्य याचा अप्रतिम नमुना म्हणजे हे सँड आर्ट’. या कलाकृतीवर ‘Bye Bye Polio’ लिहिलेलं आपण बघू शकतो.

सुदर्शन पटनायक यांना संपूर्ण जग त्यांच्या ‘सँड आर्ट’ साठी ओळखते. त्यांच्या अनेक कलाकृत्या जगभरात प्रसिद्ध आहेत. नुकतचं त्यांनी सर्वात उंच वाळूचा किल्ला बनवून गिनीज बुक मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.

या अप्रतिम कलाकृतीसाठी सुदर्शन पटनायक यांना मानाचा मुजरा !!