computer

तुम्ही कसे झोपता? त्यावरून मानसशास्त्रज्ञ तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय निष्कर्ष काढतात ते ही वाचा...

खरंतर कुणाशी ओळख झाल्याशिवाय समोरची व्यक्ती कशी आहे हे आपल्याला कळत नाही. पण मानसशास्त्रज्ञ लोकांचं नुसतं निरिक्षण करून काय-काय सांगू शकतात याला तोड नाही. देहबोली, सही, कोण कसा चालतो, कसा बसतो यावरूनही एखाद्या व्यक्तीबद्दल ते बरंच काही सांगतात. गंमत म्हणजे एखादी व्यक्ती कशी झोपते यावरून देखील हे मानसशास्त्रज्ञ अनेक गोष्टी सांगतात.. अर्थात हे साधारण आडाखे असतात आणि प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच. त्यामुळं यातलं चांगलं ते घेऊन न पटणारं मनोरंजन म्हणून सोडून देण्याचा पर्याय आहेच! चला तर मग, आज आपण याच विषयी जाणून घेऊयात.

१. पाठीवरती झोपणे-
पाठीवरती झोपणाऱ्या लोकांना सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हायला आवडते. त्यांना समविचारी लोकांबरोबर राहायला आवडते. सहसा या लोकांचे व्यक्तिमत्व चार लोकांत ठळकपणे उठून दिसते. असे लोक कुठल्याही किरकोळ बोलण्यात किंवा कुठल्याही किरकोळ गोष्टींमध्ये गुंतत नाहीत. ज्या गोष्टी किंवा जे लोक यांचे समर्थन करत नाहीत अशा गोष्टी हे लोक हमखास टाळतात. या लोकांना नेहमीच दुसऱ्यांकडून आणि स्वत:कडून मोठ्या अपेक्षा असतात. मात्र रंगवून सांगितलेल्या खोट्यापेक्षा स्पष्टपणे खरे बोललेले जास्त आवडते. पाठीवर झोपणारे लोक अत्यंत काळजीपूर्वक आणि सातत्याने स्वतःचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत असता. ते नेहमी स्वतःच्या यशाचा विचार करतात. त्यांना स्वतःला वेळ द्यायला आणि भविष्यात ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होताना बघायला फार आवडते.

२. एका अंगावर किंवा एका बाजूवर झोपणे-
एका कुशीवर झोपणारे लोक शांत, विश्वासू, सरळमार्गी, उत्साही, हवं ते मिळवणारे, सर्वांत मिळून मिसळून राहणारे असतात. यांना ना त्यांच्या भूतकाळाविषयी पश्चाताप वाटतो, ना भविष्याची चिंता वाटते. ते नेहमी परिस्थितीशी जुळवून घेतात. नेहमी प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू समजून घेतात. त्यांना त्यांचे गुण-दोष अगदी व्यवस्थित माहित असतात ज्यामुळे इतरांना यांचा अपमान करणे किंवा त्यांना त्रास देणे सहज शक्य होत नाही. कठीण काळातही या लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते.
कुशीवर झोपणारे लोक एका अंगावर हात बाजूला पसरून झोपत असतील तर, त्यांना नेहमी दुसऱ्या व्यक्तींबद्दल संशय वाटतो असे मानले जाते. अशा व्यक्तींना दुसऱ्याचे मत फारसे पटत नाही. ते नेहमी स्वतःच्या निर्णयावर आणि मतांवर ठाम असतात.
मात्र ते एका अंगावर झोपताना एखादी उशी दोन्ही पायांच्या मध्ये ठेऊन किंवा तिला मिठी मारून झोपत असतील तर, ते नेहमीच दुसऱ्यांना मदत करतात. असे लोक नेहमीच आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही गोष्टींपेक्षा नात्याला जास्त महत्व देतात.

३. दोन्ही पाय पोटाशी घेऊन झोपणे-
गर्भात असणाऱ्या बाळासारखे दोन्ही पाय पोटाशी घेऊन झोपणाऱ्या लोकांना नेहमी अनेक गोष्टींपासून संरक्षण हवे असते. इतरांनी त्यांना समजून घ्यावे किंवा त्यांची काळजी घेतली जावी असे त्यांना नेहमी वाटते. झोपण्याची ही पद्धत अशा लोकांना नेहमी चिंतामुक्त राहण्यास मदत करते. हे लोक इतर लोकांपुढे व्यक्त व्हायला घाबरतात. यांना कुणावरही विश्वास नसतो. हे लोक फक्त आपले कुटुंब आणि अशा व्यक्तींच्या जवळ असता ज्यांनी कठीण परिस्थितीमध्ये मदत केलेली असते. या स्थितीमध्ये झोपणाऱ्या व्यक्ती लाजाळू, संवेदनशील, निरागस अशा असतात. त्यांना लोकांमध्ये मिसळायला फारसे आवडत नाही म्हणून ते ज्यासाठी फार लोकांमध्ये मिसळावे लागणार नाही अशा गोष्टी (उदा. चित्र काढणे, नाचणे, लिहिणे इत्यादी) करतात.

४. पोटावरती किंवा पालथे झोपणे-
पालथे झोपणाऱ्या व्यक्ती प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या, जोखीम पत्करणाऱ्या, धाडसी, स्वतःच्या समस्या सोडवणाऱ्या अशा असतात. हे इतरांना उत्तम मार्गदर्शन करु शकतात. असे लोक नेहमीच एक उत्तम नेते बनू शकतात. यांच्यासाठी नेहमीच आठ तास झोप महत्वाची असते ज्यामुळे ते नेहमी उत्साही राहू शकतात. हे लोक प्रसंगी शांतपणे किवा कठोरपणे इतरांना मार्गदर्शन करतात. मात्र यांना यांच्यावर केलेल्या टीका, सुचवलेले बदल अजिबात आवडत नाहीत. अशा वेळी ते फार अस्वस्थ होताता.

आता सांगा, तुम्ही नक्की कसे झोपता? त्याप्रमाणे या आडाख्यांनुसार तुमचा स्वभाव कसा आहे? हे अंदाज आणि तुमचा स्वभाव यात कितपत फरक आहे?

असो. आपण हे लक्षात घेतले पाहिजेल कि कोणतीही व्यक्ती नेहमी एकाच पद्धतीने झोपत नाही. आपण झोपेत अनेक वेळा स्थिती बदलत असतो. काहीवेळा झोपताना आपण एकापेक्षा अनेक पद्धतींचा अवलंब करतो. अशा पद्धती तुमच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखवत असतात. आणि आधी म्हटल्याप्रमाणे हे सर्वसामान्य निष्कर्ष आहेत, सर्वांसाठी ते अगदी योग्य ठरतीलच असे नाही. तुम्हांला काय वाटतं?

सबस्क्राईब करा

* indicates required