या मुलीला पुरुषांचा आवाज ऐकू येत नाही ? काय आहे या मागचं तथ्य ??

मंडळी, शीर्षक वाचून दचकलात ना ? खरं तर या प्रकारची ही अत्यंत दुर्मिळ केस आहे. चला जाणून घेऊया नक्की काय घडलंय ते !!

चीनच्या ‘चेन’ नावाच्या मुलीला सकाळी उठल्यावर लक्षात आलं की तिला आपल्या बॉयफ्रेंडचा आवाज ऐकू येत नाहीय. याची चिन्ह तिला रात्री झोपतानाच आढळली होती. तिला मळमळायला होत होतं आणि कानाला त्रास होत होता.

स्रोत

तर, ती लगेच पोहोचली हॉस्पिटल मध्ये. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तपासणीत ही एक साधारण बहिरेपापणाची केस असल्याचं समजलं. या तपासणीने समाधान न झाल्याने एका तज्ञांनी तिची तपासणी केली. या दुसऱ्या तपासणीत खरी गोष्ट उघड झाली. तिचा आजाराला वैद्यकीय भाषेत ‘Reverse-Slope Hearing Loss’ म्हणतात. सोप्प्या भाषेत सांगायचं झालं, तर तिला केवळ उच्च स्वरातील आवाज ऐकू येऊ शकतात.

मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग तिला फक्त पुरुषांचेच आवाज का ऐकू येत नाहीत ? तर त्याचं उत्तर असं आहे, स्त्रियांचा आवाज हा साधारणपणे उच्च स्वरातील असतो आणि पुरुषांचा खालच्या स्वरातला.

स्रोत

मंडळी, ही इतकी सरळ सरळ केसही नाही. तिला ज्या डॉक्टरांनी तपासलं त्यांचा आवाज तिला ऐकू येत होता, पण त्याच्या अगदी उलट तरुण मुलाचा आवाज तिला ऐकू आला नाही. म्हणजे तिला सगळ्याच पुरुषांचा आवाज ऐकू येणार नाही ही जी बातमी आहे ती खोटी ठरते !!

तर, वैद्यकशास्त्राच्या इतिहासात अशी केस अगदी कमी वेळा दिसून येते. हा आजार जवळजवळ १३,००० लोकांमधून एकाला होतो.

या आजाराची करणं काय आहेत ?

स्रोत

या आजाराचं कारण आहे ताणतणाव. शरीराला पुरेशी विश्रांती नसणे. रात्ररात्रभर जागणे यामुळे हा आजार उद्भवतो. पण वर सांगितल्याप्रमाणे या आजाराचं प्रमाण फारच कमी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required