या माणसाच्या पोटातून निघाले तब्बल ६३९ खिळे....वाचा हा काय प्रकार आहे !!

मंडळी, कोलकत्ता मध्ये एक जगावेगळं ऑपरेशन पार पडलंय. या ऑपरेशन मध्ये रुग्णाच्या पोटातून चक्क ६३९ खिळे काढले गेलेत. तुम्ही बरोबर ऐकलं राव !! खिळे, खिळे खिळे !!!


स्रोत

तर मंडळी, ‘कलकत्ता मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल’ मध्ये एक माणूस आला. त्याच्या पोटाच्या वरच्या भागात दुखत असल्याची त्याची तक्रार होती. डॉक्टरांनी तपासणी केली, एक्स-रे काढला आणि मग त्यांना दिसलं की या माणसाच्या पोटात तर चक्क खिळे आहेत.

या माणसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून जेवण सोडलं होतं. खरं तर खूप पूर्वी पासून तो खिळे खात होता पण हे प्रमाण हाताबाहेर गेल्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागलं आणि त्याची रवानगी हॉस्पिटल मध्ये झाली.

ऑपरेशन करताना एवढे खिळे काढायचे कसे ? त्यावेळी डॉक्टरांना चुंबकाची आठवण झाली. मग त्यांनी चुंबकाने पोटातून एक एक करून खिळे बाहेर काढले. खिळ्यांबरोबर माती देखील बाहेर पडली कारण या महाभागाने माती बरोबर खिळे खाल्ले होते.

सर्व खिळे बाहेर काढल्या नंतर त्यांची संख्या तब्बल ६३९ होती. प्रत्येक खिळा हा दोन ते अडीच इंच लांबीचा होता. तुम्ही फोटो मध्ये हे पाहू शकता.


स्रोत
 

या मागील कारण काय ?

स्कीजोफ्रेनिया या आजाराबद्दल ऐकलंय का राव ? हा एक मानसिक रोग आहे. यात माणसाला वाटत असतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे, त्याला कोणीतरी मारणार आहे, त्याच्या विरुद्ध कट रचले जात आहेत. अर्थात, त्याचं स्वतःचं विश्व तो तयार करतो. हाच स्कीजोफ्रेनिया आजार या रुग्णाला झाला होता आणि यातच त्याने जेवण सोडून खिळे खायला सुरुवात केली.

सबस्क्राईब करा

* indicates required