दिल्लीकारांनो हा मास्क वापर आणि जीव वाचवा !!

दिल्ली मध्ये वायु प्रदूषण मोठ्या प्रामाणात वाढलंय. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा तब्बल ७० टक्क्यांनी जास्त हवा दिल्लीत प्रदूषित झाली आहे. सोशल मिडियावर धुक्यांमुळे होणाऱ्या अपघाताचे व्हिडीओ तुम्ही बघितले असतीलच. काहीवेळा वाटतं की दिल्लीची परिस्थिती जणू चीन सारखी होत चालली आहे आहे.

मंडळी जीवघेण्या प्रदूषणामुळे आरोग्यास धोका होऊ नये म्हणून डॉक्टरांनी N-90 आणि N-95 हा मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.


स्रोत

साधारणपणे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा जमिनीपासून १० फुट उंचीवरील वायू स्थरातून आपल्या फुफ्फुसात हवा जाते. या १० फुट उंचीवरील हवेत जर घातक रासायनिक घटक असतील तर फुफ्फुसाचे आजार, हृदय विकार, कँसर इत्यादी आजार होऊ शकतात. दिल्लीतल्या हवेत सध्या अश्या जीवघेण्या रसायनांची भरमार आहे त्यामुळे हा N-95 मास्क उपयुक्त ठरू शकतो.

N-90 हा विषारी वायूपासून संरक्षण देणारा आधुनिक मास्क आहे त्यामुळे चीन मधील बीजिंग, शांघाय सारख्या प्रदूषणाची पातळी जास्त असलेल्या शहरांमध्ये हा मास्क मोठ्या प्रमाण वापरला जातो. आता याची खरी गरज आपल्यालाही आहे.


स्रोत

 

खालील लिंकवरून N-95 मास्क ऑनलाईन मागवता येईल.

https://www.amazon.in/Aaram-Swine-Mask-Dust-Respirator/dp/B00U92RTVM

https://www.amazon.in/N95-Particulate-Respirators-Masks-90-9520N/dp/B002TT0P6E

https://www.alibaba.com/showroom/3m-dust-mask-9001v-3m-9002v-n90-mask-3m-p1-mask-3m-earloop-mask.html