computer

लवकरात लवकर दाढी वाढवण्याचे १० भन्नाट उपाय....

सध्या काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. कधीकाळी दाढी ठेवणे म्हणजे साधू टाईप लोकांचे काम मानले जायचे. आपण कसे टापटीप, क्लीन शेव असलो कि लोकांना जाम भारी वाटायचे. एखाद्याची मोठी दाढी दिसली कि एकतर हा प्रेमात मार खाल्लेला आहे किंवा परीक्षेत नापास झाला आहे असे समजले जायचे. पण कधी कुठल्या गोष्टीचे चांगले दिवस येतील सांगता येत नाही. सध्या देशात अच्छे दिन येतील तेव्हा येतील पण दाढीला मात्र अच्छे दिन आलेले आहेत. 

आता सगळीकडे दाढी वाल्यांची हवा आहे मग तुम्हाला पण मोठी दाढी ठेवायची हौस असेलच ना मंडळी!!! पण आपल्या भिडू लोकांचा प्रॉब्लम असा आहे कि त्यांना दाढीच येत नाही ना राव!! अगदी पंचविशी येऊन जाते तरी दाढीचे खुंट घेऊन फिरावे लागते. मग बाजूचे गबाळे मूल पण दाढी वाढवून हवा करते. खरे आहे कि नाही मंडळी? अश्यातच मग दाढी वाढवणाऱ्या औषधांना पेव फुटले आहे. पण काही सोपे उपाय केल्यास तुमची दाढी लवकर वाढू शकते मंडळी !!

चला तर मग बघूया काही सोपे उपाय

1) एक्सरसाईज

रोज व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत हे तुम्ही जाणताच. त्याने तुमची दाढी वाढायला सुद्धा मदत होईल मंडळी!! ते असे कि दाढी वाढण्यासाठी आपले टेस्टोस्टेरॉन बुस्ट होणे गरजेचे असते. व्यायामाअभावी तेच होत नाही. नियमित व्यायाम केल्यास तुमचे टेस्टोटेरॉन बुस्ट होऊन लवकर दाढी येण्यास मदत होते.

2) मसाज

रोज आवळ्याच्या तेलने दाढीला मसाज करावा. हा कमी खर्चात करता येणारा सोपा उपाय आहे. बाजारातून थोडे आवळे आणून त्यांचे तेल बनवावे व त्याने रोज काही वेळ दाढीला मसाज करावा. याने तुमच्या दाढीचे केस वाढण्याचा मार्ग मोकळा होतो.

3) नियमित चेहरा साफ ठेवणे

मंडळी तुमचे जास्त उन्हात फिरणे सुद्धा तुमच्या दाढी न वाढण्याला कारणीभूत असते. चेहरा क्लीन नसला कि दाढी वाढण्याला अडचणी येतात. चेहर्यावर घान असली कि दाढी वाढणे कठीण असते अश्या परिस्थितीत नियमित चेहरा साफ ठेवणे गरजेचे असते. बाहेरून आल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा जेणेकरून चेहऱ्यावर घान कमी होईल आणि दाढी वाढण्याला मदत होईल.

4) टेन्शन कमी घेणे

ताणतणावात राहणे हे सुद्धा दाढी न वाढण्याचे एक कारण समजले जाते.  टेंशन जेवढे कमी तेवढे आपले शरीर चांगले राहते. टेन्शन घेण्याचे फक्त मनावर नाहीतर शरीरावर सुद्धा चुकीचे परिणाम होतात मंडळी!! झोप ही सुद्धा दाढी न वाढण्याला जबाबदार गोष्ट समजली जाते. नियमित 8 तास शांत झोप घेतल्याने दाढी लवकर वाढते.

5) 'प्रोटीन'युक्त जेवण

आपले जेवनात जेवढा जास्त प्रोटिन्सचा समावेश असतो. तेवढे आपले आरोग्य चांगले राहते. दाढी वाढायला सुद्धा मदत होते हा एक बोनस आहे. मंडळी जेवणात शक्य तेवढ्या जास्त प्रोटिन्सचा समावेश असायलाच हवा. त्याशिवाय दाढी वाढणे कठीण असते.

6) परत परत दाढी न करने

बऱ्याच लोकांना परत परत दाढी करण्याची सवय असते. नियमित दाढी केल्याने चांगली दाढी येते हा एक मोठा गैरसमज लोकांना असतो. मंडळी उलट परत परत दाढी केल्याने चांगली दाढी यायला प्रॉब्लम येतात. म्हणून जोपर्यंत गरज येत नाही तोपर्यंत दाढी करणे टाळले पाहीजे.

7) जास्त पाणी पिणे

पाणी पिण्याचे किती फायदे आहेत यावर आम्ही याआधी लेख पण लिहिला होता. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे चांगली दाढी येणे. तुम्ही रोज मोठ्या प्रमानावर चांगले पाणी पित असाल तर तुमचा दाढी वाढण्याचा मार्ग मोकळा होतो.

8) सिगरेट पासून दूर रहा

व्यसन कुठलेही असले तरी ते शरीराला हानिकारक असते हे तुम्ही जाणताच, पण जर तुम्ही दाढी वाढवण्याचा निश्चय केला असेल तर तुम्हाला सिगरेट पासून दूर रहावे लागेल बॉस!! दाढी न वाढायला सिगरेट पिणे हे एक कारण सुद्धा जबाबदार असते. म्हणून तुम्हाला चांगली दाढी हवी असेल तर सिगरेट आजच सोडून द्या.

9) शॅम्पू करा.

शॅम्पू फक्त डोक्याच्या केसांना करायचा असतो अशी एक साधारण समज आपल्या लोकांमध्ये असते. पण तुम्हाला मोठी दाढी हवी असेल तर दाढीलासुद्धा शॅम्पू करणे गरजेचे आहे मंडळी!! शाम्पू केल्यावर कंडिशनरचा सुद्धा वापर करावा,जेणेकरून दाट दाढी यायला मदत होईल. 

10) बाहेरचे खाणे टाळा

बाहेरचे जेवण खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते हे तुम्ही जाणताच, त्याचा अजून एक चुकीचा परिमाण म्हणजे तुमच्या दाढ़ी वाढविण्याचे स्वप्न त्यामुळे अपूर्ण राहु शकते. त्यामुळे दाढ़ी वाढविण्यासाठी बाहेरच्या जेवनाला राम राम करणे जरूरी आहे.

मंडळी तुम्ही नाही पण तुमच्या मित्राला जर मोठ्या दाढ़ीची ईच्छा असेल तर त्यांच्यासोबत हा लेख जरूर शेयर करा...

 

आणखी वाचा :

तुमच्या 'बियर्ड' लुकसाठी १३ झक्कास आयडियाज !!

काय म्हणता, कुत्र्याच्या केसांपेक्षा दाढीत जास्त जंतू असतात ? कसं काय ??

सबस्क्राईब करा

* indicates required