computer

राजा रविवर्माच्या ११ चित्रनायिकांना या फोटोग्राफरने सत्यात आणलंय, प्रयत्न कितपत जमलाय असं तुम्हांला वाटतं?

दक्षिण भारतातले प्रसिद्ध फोटोग्राफर जी वेंकट राम यांनी २०२० सालच्या कॅलेंडरचं अनावरण केलं आहे. या कॅलेंडरसाठी त्यांनी आगळावेगळा प्रयोग केलाय. त्यांनी राजा रविवर्मा यांच्या चित्रांना नव्याने जिवंत केलंय. यासाठी त्यानी दक्षिण भारतातल्या सिनेक्षेत्र आणि नृत्यक्षेत्रातल्या ११ प्रसिद्ध अभिनेत्रींची निवड केली आहे.

श्रुती हसन, रम्या कृष्णा, समंथा रूथ प्रभू, ऐश्वर्या राजेश, नादिया, खुशबू सुंदर,  इत्यादी अभिनेत्रींनी राजा रविवर्मा यांच्या प्रसिद्ध चित्रांतील पात्रं साकारली आहेत. चित्रांसाठी चेहरा निवडताना खास काळजी घेण्यात आली आहे हे बघितल्यावर लगेच समजून येतं. एक मात्र आहे की राजा रविवर्मा यांनी चितारलेली स्त्री ही जास्त अस्सल वाटते. दुसऱ्या बाजूला आताचे चेहरे हे अधिक नाटकी वाटतात.

चला तर जास्त वेळ न दवडता हे अप्रतिम फोटोग्राफ्स पाहून घ्या.

१. या चित्रात दिसणारी स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून राजा रविवर्मा यांची मुलगी ‘महाप्रभा थंपुराती’ आहे. तिने स्वतःच्या बाळाला कडेवर घेतलं आहे. या बाळाचं नाव मार्तंड वर्मा.

२. या चित्रात दिसणारी स्त्री एक साधारण स्त्री आहे. राजा रविवर्मा यांनी या चित्राला ‘Expectation’ नाव दिलं होतं.

३. या चित्राचं नाव आहे ‘दि कोक्वेट’ म्हणजे सोप्या भाषेत ‘नखरे दाखवणारी’. चित्रातल्या स्त्रीचे हावभाव आणि चित्राला दिलेलं नाव  किती समर्पक आहे हे तुम्ही पाहूच शकता. असं म्हणतात  की राजा रविवर्मा यांना सोने आणि आभूषणांची आवड होती. याचं प्रतिबिंब या चित्रात पाडलं आहे.

४. या चित्राचं  नाव आहे ‘माद्री’. या चित्रात राजा रविवर्मा यांनी महाराष्ट्रातील एका सर्वसाधारण स्त्रीचं चित्र रेखाटलं आहे.

५.  या चित्राचं नाव आहे ‘चंद्रप्रकाशातील राधा’. हे चित्र तब्बल २००,०००, ००० रुपयांना विकलं गेलं  आहे.

६. राजा रविवर्मा यांनी ‘हंस आणि दमयंती’ चित्र १८९९ साली साकारलं. प्रसिद्ध ‘नल दमयंती’ कथेतील हा एक प्रसंग आहे. एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले नल आणि दमयंती हे एका सोनेरी  हंसाच्या मार्फत एकमेकांशी संपर्क ठेवायचे. या चित्रात हंस दमयंतीला नलाचा संदेश सांगत आहे.

७. या चित्राचं नाव आहे ‘कादंबरी’. हे चित्र राजा रविवर्मा यांचं शेवटचं चित्र आहे.

८. हे चित्र राणी लक्ष्मीबाई यांचं आहे. झांसीच्या राणी नव्हे तर त्रावणकोरच्या राणी  लक्ष्मीबाई.

९. हे चित्र पुदुक्कट्टैच्या राणी ‘सुबम्मा बाई साहेब’ यांचं आहे. त्या राजा रामचंद्र टोंडाईमन यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.

१०. विजयनगरम जिल्ह्यातील कुरुपम गावच्या राणीचं हे चित्र आहे. जी वेंकट राम यांनी चित्रातील राणी तेवढीच निवडली आहे. खरं तर हे चित्र कुरुपम गावच्या राजा आणि राणी या दोघांचं आहे.

११. राजा रविवर्मा यांनी या चित्रात केरळच्या राजघराण्यातील स्त्री चितारली आहे. केरळची संस्कृती आणि तिथलं स्त्री सौंदर्य या चित्रातून दिसतं.

१२. या आहेत बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई. तंजावरच्या लक्ष्मी विलास महालाचं नाव चिमणाबाई यांच्याच नावावरून ठेवण्यात आलं.

सबस्क्राईब करा

* indicates required