computer

देहांत शासनापूर्वी या ८ गुन्हेगारांनी व्यक्त केल्या होत्या या विचित्र अंतिम इच्छा!!

काही मोजक्याच देशांमध्ये देहांत शासनाची शिक्षा दिली जाते. गुन्हेगाराला फाशी किंवा इतर मार्गांनी मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारण्याची जुनी पद्धत आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माणूस नेमकं काय मागेल हे कोणालाच सांगता येत नाही. जगात असे काही गुन्हेगार होऊन गेले ज्यांनी मरण्यापूर्वी फारच विचित्र इच्छा व्यक्त केल्या होत्या. आजच्या लेखात आपण अशा गुन्हेगारांची यादी पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया.

१. व्हिक्टर फेगुअर

व्हिक्टर फेगुअरला खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा झाली होती. शेवटची इच्छा काय? असं विचारल्यावर त्याने ‘बी’ असलेल्या ऑलिव्हची मागणी केलो होती. मेल्यानंतर आपल्या शरीरातून झाड उगावं अशी त्याची इच्छा होती.

२. रॉनी ली गार्डनर

रॉनी ली गार्डनरने चोरीच्या दरम्यान एकाचा खून केला होता, त्यासाठी त्याला देहांत शासनाची शिक्षा झाली होती. त्याला आयुष्याच्या शेवटी ॲपल पाय आणि आईस्क्रीम खाता खाता “The Lord Of The Rings” पहायचं होतं. ही इच्छा पूर्ण करण्यात आली.

३. जेम्स एडवर्ड स्मिथ

जेम्स एडवर्ड स्मिथ या गुन्हेगाराने आपल्या शेवटच्या इच्छेत माती मागितली होती. त्याला वुडू या जादूटोण्याच्या प्रकारातील एक विधी करायचा होता. त्याची ही शेवटची इच्छा मान्य करण्यात आली नाही.

४. विल्यम बोनिन

२१ व्यक्तींची हत्या, तसेच बलात्कारातील आरोपी विल्यम बोनिनला देहांत शासनाची शिक्षा झाली होती, पण त्याची इच्छा होती की आपल्याला डायबेटीसने मरण यावं. यासाठी त्याने कोकाकोला, पेप्सी, चॉकलेट आणि आईस्क्रीमची मागणी केलो होती. त्याच्या दुर्दैवाने हे सगळं खाऊनही तो सरकारी शिक्षेमुळेच मेला.

५. ओडेल बार्नेस

ओडेल बार्नेस या खुन्याने केलेली शेवटची मागणी फारच वेगळी होती. त्याने न्याय, समानता आणि जागतिक शांततेची मागणी केली होती. ही मागणी अर्थातच पूर्ण करता आली नाही. असं म्हणतात की हा गुन्हेगार आयुष्याच्या शेवटी कमालीचा बदलला होता. 

६. मायकल ने

मायकल ने हा नेपोलियनच्या सैन्यातील एक प्रमुख अधिकारी होता. युद्धातील पराभवानंतर त्याच्यावर खटला भरवण्यात आला आणि तो त्यात गुन्हेगार सिद्ध झाला. शिक्षा म्हणून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आश्चर्य म्हणजे आपण स्वतःच सैनिकांना गोळ्या झाडण्याची आज्ञा द्यावी अशी त्याची शेवटची इच्छा होती. ही इच्छा मान्य करण्यात आली.

७. धनंजय चटर्जी

१४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर खून केल्याप्रकरणी धनंजय चटर्जीला फाशीची शिक्षा झाली होती. मारण्यापूर्वी त्याला जेल डॉक्टर भाऊसाहेब चटर्जी यांच्या पाया पडायची इच्छा होती. 

८. लॉरेन्स रसेल ब्रेवर

क्रूरपणे एका कृष्णवर्णीय व्यक्तीला मारल्याबद्दल लॉरेन्स रसेल ब्रेवरला प्राणघातक इंजेक्शनद्वारे देहांत शासन देण्यात आलं. मारण्यापूर्वी त्याने शेवटची इच्छा म्हणून १० वेगवेगळे पदार्थ मागितले होते, पण हे सर्व पदार्थ त्याला दिल्यानंतर त्याने खाण्यास नकार दिला.

 

मरण समोर आल्यानंतर माणूस नक्की कसा वागेल हे सांगता येत नाही हेच खरं!!

 

आणखी वाचा :

प्राणघातक इंजेक्शन : अमेरिकेत मृत्युदंड असा दिला जातो...यापुढे तर फाशीची शिक्षा सुद्धा फिकी पडेल !!

सबस्क्राईब करा

* indicates required