आता आला भारताचा एकमेव इमर्जन्सी नंबर...या नंबरवर फोन करून तत्काळ मदत मिळवा !!

कोणत्याही इमर्जन्सीच्या प्रसंगी तत्काळ मदत मिळावी यासाठी अमेरिकेत ९११ हा नंबर फिरवला जातो. भारतात या प्रकारचा कोणता नंबर आहे ? खरं तर कोणताही नाही. आपल्याकडे पोलीस कारवाईसाठी वेगळा क्रमांक आहे, अग्निशमन दलासाठी वेगळा क्रमांक आहे, अम्ब्युलन्ससाठी वेगळा क्रमांक आहे. हे सर्व क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये आधीपासून सेव्ह असतात किंवा नसतील तर पाठ करावे लागतात.

पण हा त्रास आपल्याला या पुढे होणार नाही. कारण भारताचा असा एकमेव इमर्जन्सी क्रमांक तयार करण्यात आला आहे. या नंबरवरून कोणत्याही प्रकारची तत्काळ मदत मिळू शकते. हा क्रमांक आहे ११२.

स्रोत

मंडळी, सध्या हा क्रमांक १६ राज्यांमध्ये आणि भारताच्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत करण्यात आला आहे. आंध्रप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू, गुजरात, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान, दादरा आणि नगर हवेली, दिव-दमण आणि जम्मू-काश्मीर ही ती राज्य. २०२० पर्यंत हा क्रमांक संपूर्ण भारतभर कार्यरत होईल.  

या क्रमांकाचे काही खास फिचर पण असणार आहेत. तीन वेळा पॉवर बटन दाबल्यानंतर आपोआप ‘आपत्कालीन प्रतिसाद केंद्राला’ फोन कॉल जाणार आहे. स्मार्ट फोन व्यतिरिक्त इतर फोन्सवर ५ किंवा ९ क्रमांक दाबून धरल्यास आपत्कालीन प्रतिसाद केंद्राशी संपर्क होईल.

स्रोत

इमर्जन्सी सर्व्हिसशी ऑनलाईन पण संपर्क करता येऊ शकतो. यासाठी https://ners.in/ ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. याखेरीज ११२ हा अॅप पण लाँच करण्यात आला आहे. या अॅप मध्ये खास लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी SHOUT (ओरडणे) फिचर आहे. या फिचरचा वापर करून आपण तत्काळ मदत मिळवू शकतो.

मंडळी, तत्काळ मदतीसाठी हे एक मोठं पाऊल असणार यात शंका नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required