computer

या मुलींनी गांधीजयंतीनिमित्ताने केलंय जगावेगळं गिनीज रेकॉर्ड!!

महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला अनेक लोक वेगवेगळे उपक्रम राबवतात. गांधी जयंतीच्या दिवशी  गुजरातमधील दोन मुलींनी गिनीज बुक रेकॉर्ड केला आहे. गिनीज बुक रेकॉर्ड म्हटला म्हणजे तो काहीतरी भन्नाट असतो. हा पण तसाच भन्नाट रेकॉर्ड आहे. हा मुलींनी चक्क 53 किलोमीटर उलटे चालून दाखवले आहे. तेही सलग 13 तास!!

स्वाती ठाकर आणि ट्विंकल ठाकर असे त्यांचे नाव आहे. त्यांचे म्हणणे आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महिला सशक्तीकरणाच्या मॅसेजने ते प्रेरित झाले आहेत. आणि अन्य महिलांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी प्रेरीत करण्याची त्यांची ईच्छा आहे. 

या दोघांनी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजेला बारडोलीहुन यात्रा सुरू केली तर ती दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजेला दांडीला समाप्त झाली.

त्यांनी त्यांच्या या विक्रमाची माहिती गिनीज बुक रेकॉर्ड समितीकडे पाठवली आहे. त्या दोन्ही मुली सांगतात की सुरुवातीला त्यांना हे काम होईल की नाही याबद्दल शंका होती पण घरच्यांनी विश्वास दिल्यावर त्यांनी हा रेकॉर्ड करून दाखविला.

सबस्क्राईब करा

* indicates required