computer

जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत चालल्या भारताच्या या पाच किशोरवयीन मुली!!

दरवर्षी FIRST Global challenge या संस्थेतर्फे एक रोबोटिक्स स्पर्धा भरवण्यात येते. या स्पर्धेत विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील जगभरातल्या तरुणांना आमंत्रण दिलं जातं. ही ऑलेम्पिक सारखी रोबोटिक्स स्पर्धा आहे. यात प्रत्येक देशाची एक टीम त्या देशाचं प्रतिनिधित्व करते.

मंडळी, भारतासाठी २०१९ वर्ष खास आहे. कारण भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या टीममध्ये सर्वच्या सर्व स्पर्धक या मुली असणार आहेत. संपूर्णपणे मुलींची फौज असलेली ही पहिलीच भारतीय टीम असेल.

भारताच्या टीममध्ये ५ मुली आहेत. प्रत्येकाची ओळख करून घेऊया.

आरुषी शाह : आरुषी ही टीमसाठी रोबॉट डिझाईन, बांधणी आणि इलेक्ट्रीक्सचं काम बघते.

राधिका सेखसरीया : निधी गोळा करणे आणि प्रोग्रॅमिंगचं काम राधिका बघते.

आयुषी नैनन : आयुषी ही आऊटरीच आणि प्रोग्रॅमिंगचं काम करणार करते.

लावण्या लॅरीस : लावण्या ही रोबॉट कन्सट्रक्शन आणि कामाचं धोरण आखण्याचं काम करते.

या पाचहीजणी किशोरवयीन आहेत. त्या जगभरातून आलेल्या १४ ते १८ वयोगटातील २००० विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणार आहेत. जवळजवळ १९३ देशातून हे विद्यार्थी येणार आहेत.

FIRST Global challenge स्पर्धेचा २०१९ चा विषय हा समुद्रातील प्रदूषणावर आधारित आहे. समुद्रातील प्रदूषणामुळे होणारा समुद्री जीवनावर आणि माणसांवर होणारा परिणाम हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धकांना रोबोटिक्सच्या मदतीने या समस्येवर तोडगा काढायचा आहे.

दुबई येथे २४ ते २७ ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहेत. लवकरच भारताच्या या कन्या दुबईच्या दिशेने निघतील. स्पर्धेचा निकाल काहीही लागला तरी भारताला त्यांचा अभिमान वाटेल हे नक्की.

सबस्क्राईब करा

* indicates required