computer

युट्यूबवर हनुमान चालीसाची कोटीच्या कोटी उड्डाणे- सगळे उच्चांक मोडले !

भारतात अनेक लोकांचा पत्रिकेत असलेल्या शनी ग्रहाच्या पिडेवर- साडेसातीवर आणि त्यावर सांगितलेल्या उपायांवर- ह्या तिन्ही गोष्टींवर प्रचंड विश्वास आहे. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात एखादी  दुःखद घटना घडत असते तेव्हा त्याचा संबंध आपोआपच शनी ग्रहाशी पडताळून बघितला जातो आणि फक्त महाबली हनुमानच शनीला वश करू शकतोअशी कथा लहानपणा पासून ऐकत असल्याने अनेकांचा हनुमानावर विश्वास आहे.अनंत अडचणींचा सामना करतांना कोणीतरी सतत आपल्या बरोबर आहे, हा विश्वास प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही मोठ्या आपत्तीतून बाहेर पडायला मदत करतो. 
हनुमान अमर आहे आणि तो आपल्यावर आलेल्या ह्या भयंकर संकटातून बाहेर पडायला मदत करेल, असे अनेकजण मानतात. त्यामुळेच अनेकजण दर शनिवारी हनुमान मंदीरात जातात आणि दिवसाला चार चार वेळा हनुमान चालीसा वाचतात. 
रामभक्त हनुमानावर हिंदू धर्मियांची अढळ श्रद्धा आणि भक्ति आहे.

लोकांचा हाच मारुतीराया वरचा दृढ विश्वास ओळखून T-Series ने  १० मे २०११ ला यूट्यूब ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर हरिहरन ह्यांच्या आवाजातील आणि गुलशन कुमार अभिनित हनुमान चालीसा हा व्हिडिओ अपलोड केला. ह्या व्हिडिओला यंदा १२ वर्ष झाली आहेत. हा व्हिडिओ ९ मिनिट आणि ४२ सेकंदाचा आहे.

आजपर्यंत हा व्हिडिओ ३ अब्ज म्हणजेच ३०० करोड लोकांनी  बघितला आहे आणि त्याला १ करोड २० लाख लोकांनी लाईक्स दिले आहेत.हा एक नवा उच्चांक आहे


गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय नागरिक वेगवेगळ्या देशात रहात आहेत. मोबाईलमध्ये सोशल मीडिया आता सहज उपलब्ध झाल्याने जगाच्या पाठीवर कुठेही असल्यास आणि इंटरनेट उपलब्ध असल्यास, हे व्हिडिओ कुठेही, केव्हाही आणि कितीही वेळा बघता येतात. 

जगभरातील अनेकजण T-Series youtube videosना फॉलो करतात आणि ह्या कंपनीचे २३० करोडहुन जास्त लोक subscribers आहेत. हे आकडे दुसऱ्या कुठल्याही मोठ्या कंपनीपेक्षा खूप जास्त आहेत. मराठी संत रामदास रचीत ' भीमरूपी महारुद्रा ' ह्या हनुमान स्तोत्रात म्हंटल्याप्रमाणे हा हनुमान चालीसा व्हिडिओ कोटीच्या कोटी उड्डाणे मारत आहे. 

ही सगळी हनुमानाचीच कृपा आहे असंच म्हणूया आपण , काय ?

रमा ताम्हनकर

सबस्क्राईब करा

* indicates required