चक्क नाल्यात सापडला ३२०० वर्ष जुना खजिना....

काळाच्या ओघात अनेक ऐतिहासिक गोष्टींचं दफन झालेलं आहे. आपण जिथे उभे आहोत त्या जागी सुद्धा इतिहासाच्या खाणाखुणा सापडू शकतात. आता आपल्या महाराष्ट्रचंच बघा. स्वराज्याची राजधानी रायगडावर काहीच महिन्यापूर्वी ऐतिहासिक गोष्टी सापडल्या होत्या. मंडळी, असाच प्रकार इजिप्त मध्ये घडला आहे.

स्रोत

इजिप्तची राजधानी कैरोमध्ये मातेरीया वस्ती आहे. या जागी ऐतिहासिक खजिना सापडेल असं कोणाच्या मनातही आलं नव्हतं. काही महिन्यांपूर्वी शास्त्रज्ञांनी या जागी खोदकाम सुरु केलं. या शोधात त्यांच्या हाती काही पुरातन वस्तू लागल्या. त्यांची उत्सुकता चाळवली गेली. पुढे त्यांनी आणखी शोध घेतला. पण या पुढच्या टप्प्यात त्यांना काहीच मिळालं नाही.

स्रोत

मग त्यांनी आपला शोध वेगळ्या दिशेने वळवला. या वस्तीच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला काहीच हाती लागलं नाही पण आश्चर्य म्हणजे तब्बल १०० फुट खाली त्यांना एक मूर्ती सापडली. ही मूर्ती होती ३२०० वर्षांपूर्वी इजिप्तवर राज्य केलेल्या ‘राम्सेस २’ या फॅरोची. या मूर्तीचा निर्मितीकाळ ३२०० वर्ष जुना असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

मंडळी एक राज्य दुसऱ्या राज्याच्या थडग्यावर उभं राहतं हा इतिहास आहे. राम्सेसने राज्य केलेल्या हिलियोपोलीस या शहराचं देखील असंच झालं. रोमन सम्राटांनी या शहराचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी या शहराला धुळीस मिळवून त्या जागी नवीन साम्राज्य उभं केलं. त्यामुळेच राम्सेसची मूर्ती जमिनीत गाडली गेली.

स्रोत

मंडळी ऐतिहासिक शहर हिलियोपोलीसच्या जागीच आज मातेरीयाची वस्ती वसली आहे. या शहराच्या आणखी खुणा सापडतायत का याचा शोध सध्या शास्त्रज्ञ घेत आहेत.

 

आणखी वाचा :

अबब.. ओडिशात सापडला इतक्या वयाचा खडक !! अंदाज बांधा याचं वय काय असेल ??