computer

उन्हाळ्यात मोबाईल वापरताना या ६ गोष्टी लक्षात ठेवा !!

मंडळी आपण उन्हाळ्यात जशी शरीराची काळजी घेतो तशीच आपल्या मोबाईलची देखील काळजी घेतली पाहिजे. शरीराचं तापमान वाढतं तसच स्मार्टफोनचं सुद्धा तापमान वाढतं. राव तापमान वाढल्याने मोबाईलचं आयुष्य कमी होण्याची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.

१. मोबाईलसाठी जाड कव्हर वापरू नये. जाड कव्हरमुळे मोबाईल मधली उष्णता बाहेर पडत नाही. एकावेळी दोन तीन अॅप्सचा वापर करताना कव्हर काढून ठेवा.

२. मोबाईल जास्तवेळ चार्ज करू नका. यामुळे एक तर बॅटरीचं आयुष्य कमी होतं आणि त्याच बरोबर मोबाईलचं तापमान देखील वाढतं. जर चार्जिंग करताना मोबाईल गरम झाला तर चार्जिंग बंद करा.

३. उन्हात फिरताना मोबाईलचा संपर्क उन्हाशी येणार नाही याची काळजी घ्या.

४. प्रोसेसिंग पॉवर आणि ग्राफिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या अॅप्स कमी वापर करा.

५. इंटरनेट वापरताना किंवा फोनवर बोलताना मोबाईल गरम झाला तर त्याचा वापर लगेचच थांबवा. कव्हर काढून त्याला थंड होऊ द्या.

६. रात्रभर मोबाईल चार्ज करू नका. काही स्मार्ट फोन्स बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जिंग थांबवतात. नवीन मोबाईल घेताना अशा मोबाईल फोन्सची निवड करा.