कापड्यांवरचे डाग घामाचे नाहीत बरं...जाणून घ्या कशाने हे डाग पडतात आणि ते काढायचे कसे!!

हल्ली उन्हामुळे घामाच्या धारा वाहत आहेत. त्यात जर तुम्ही पांढरे कपडे घातले असतील तर काही विचारायलाच नको. घामामुळे पांढऱ्या कपड्यांवर पिवळसर डाग पडून पांढऱ्याचे पिवळे व्हायला वेळ लागत नाही. हा डाग ठळकपणे दिसतो तो बगलेत. त्यामुळे हात उंचावायची पंचाईत होते ना भाऊ.

राव, तुम्ही कधी विचार केला आहे का हा पिवळसर डाग नेमका कशामुळे पडतो ? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हा पिवळा डाग घामामुळे तयार होत नसतो. त्यामागे एक रासायनिक कारण आहे.

राव गोंधळू नका...पुढे वाचा....

स्रोत

घामातील पिवळसर डागाचं कारण एका रासायनिक प्रक्रियेत आहे. तुमचे कॉटनचे (सुती) कपडे, घामातील प्रथिने आणि तुमच्या परफ्युम मध्ये असलेला विशिष्ट क्षार या तिघांमध्ये रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर हा पिवळसर डाग तयार होतो. राव, घामाचा वास येऊ नये म्हणून तुम्ही जो परफ्युम वापरता तोच यात महत्वाची भूमिका बजावत असतो.

परफ्युम मध्ये असणारा क्षार ‘अल्युमिनियम सॉल्ट’ म्हणून ओळखला जातो. विसाव्या शतकात हे क्षार लाल रंगाचे असायचे. त्यामुळे त्याकाळातला डीओ वापरल्यानंतर लालसर डाग पडायचे. मंडळी, तुम्हाला जर हा डाग पडू नये असं वाटत असेल तर सर्वात आधी तुमचा परफ्युम बदला. हल्ली बाजारात ‘अल्युमिनियम सॉल्ट’ विरहित परफ्युम उपलब्ध आहेत. त्यांचा तुम्ही वापर करू शकता.

हे डाग काढायचे कसे ?

स्रोत

या डागांना काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर, हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा ऑक्सिजनयुक्त ब्लीच वापरू शकता. ब्लीच वापरताना तो क्लोरीन ब्लीच नसावा याची काळजी घ्या.

मंडळी जाता जाता आणखी एक गोष्ट सांगतो. घामाला जो वास येतो तो घामामुळे किंवा या पिवळसर डागामुळे येत नसून तो घामावर असलेल्या जंतूंमुळे येत असतो. हे जंतू एक प्रकारे दुर्गंधी तयार करण्याचं काम करतात.

राव, या पुढे उन्हात बाहेर पडताना काळजी घ्या बरं का !!

 

आणखी वाचा :

उन्हाळ्यासाठी ९ ​​सर्वोत्कृष्ट थंड पदार्थ

कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा...!!

सबस्क्राईब करा

* indicates required